याला गुजरात मॉडेल म्हणायचं का? ट्रकमधून करतायत व्हेंटिलेटरची वाहतूक
ventilator is being delivered to the hospital from a garbage truck In Gujarat

याला गुजरात मॉडेल म्हणायचं का? ट्रकमधून करतायत व्हेंटिलेटरची वाहतूक

सूरत : सध्या देशात गुजरात मॉडेलची जोरदार चर्चा सुरू असताना अशी एक घटना घडली की, याला आदर्श मॉडेल म्हणायचं का नाही असा विचार करायला लागणार आहे. कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर पोहचविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. राजधानी सूरत महानगरपालिकेच्या कचरा गाडीतून हे व्हेंटिलेटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होते, हे दृश्य पाहून  नागरिकांनी डोक्याला हात लावला आणि त्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले. 

सोमवारी गुजरातमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सलग दुसऱ्या दिवशी 2800 हून अधिक नवे रुग्ण पॉझीटिव्ह आले. त्यात 724 नव्या केसेस राजधानी सूरतमध्ये आढळल्याने प्रशासन खडबडून जागं झालं आहे. 

कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला गुजरात सरकारने व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. वलसाडमधून 34 व्हेंटिलेटर  सूरतला नेत असतांना ही वाहतूक कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून  केल्याची गंभीर बाब समोर आली. सूरत महापालिकेने हे व्हेंटिलेटर आणण्यासाठी कचऱ्याचे ट्रक पाठवले होते. ट्रक कचऱ्याचे आहे हे दिसत असतांनाही वलसाड प्रशासनाने त्याच ट्रकमध्ये व्हेंटिलेटर भरून पाठवले. 

कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून व्हेंटिलेटर नेण्यात आल्याचा प्रकार समजल्यानंतर वलसाडचे जिल्हाधिकारी आर.आर.रावल यांनी त्वरीत चौकशीचे आदेश दिले. 

दरम्यान, गुजरामध्ये सध्या कोरोना रुग्णसंख्येने सोमवारी दिवसभरात तीन हजाराचा आकडा पार केला आहे. 24 तासात 3160 रुग्ण पॉझीटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या आता  3 लाख 21 हजार 598 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 4581 जणांचा मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com