वाराणसीच्या चर्चमध्ये होतो हरहर महादेवाचा गजर

The verses of the psalm with the Bible message are carved on the walls of St Marys Cathedral church
The verses of the psalm with the Bible message are carved on the walls of St Marys Cathedral church

वाराणसी: वाराणसीच्या सेंट मेरी कॅथेड्रल चर्च हे जगातील एक अनोख्या चर्चपैकी एक आहे. या चर्चच्या भिंतींवर बायबल संदेशासह गीतेचे श्लोक कोरलेले आहेत. या सर्वा व्यतिरिक्त हर हर हर महादेवाचा गजर या चर्चमध्ये ऐकायला मिळतो.

देशाची सांस्कृतिक राजधानी अलृसलेलती वाराणसी तेथिल गंगा-जमुना ह्या अगदी आदराने सर्वधर्म समभावाचा संदेश देते. गंगा, उत्तर वाहिनीच्या काठावर वसलेल्या या शहरात जगातील असं  एक अनोखं चर्च आहे, जिथे गीताच्या श्लोकांचे आवाज ऐकू येतात. वाराणसीचं हे चर्च संपूर्ण जगातील सर्वधर्म समभावाचे एक उदाहरण आहे.

सेंट मेरी कॅथेड्रल चर्चच्या भिंतींवर बायबलमधील संदेशासोबत श्रीमद् भागवत गीतेमधिल श्लोक पितळ धातूच्या पत्रांवर कोरले आहेत. हे श्लोक चर्चच्या आतील प्रत्येक भिंतींवर पाहिले आणि वाचले जाऊ शकतात.  एक रविवार दिवस सोडला तर ख्रिसमसचा दिवशी कोरल गाणी येथे ऐकायला येतात.

अष्टकोनी वास्तूचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

सेंट मेरी कॅथेड्रल हे अष्टकोनी वास्तूचे एक अनन्यसाधारण उदाहरण आहे. भारतीय संस्कृती लक्षात घेऊन ही वास्तू तयार केली गेली आहे. चर्चचा खालचा भाग अष्टकोनी आकाराच्या फुलासारखा आहे. आणइ हा आकार प्रख्यात आर्किटेक्ट कृष्णा मेनन आणि ज्योती शाही यांनी डिझाइन केला आहे.

हर हर महादेवचा होतो गजर 

चर्चचे फादर विजय शांती राज म्हणाले की सर्व धर्मातील लोक प्रार्थना करण्यासाठी या चर्चमध्ये येतात. रविवारी प्रार्थना झाल्यानंतर हर-हर महादेवचा जयघोषही येथे होतो. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की हे चर्च येशू ख्रिस्ताचा संदेश प्रतिबिंबित करते ज्यामध्ये त्याने देवाला एक संदेश दिला आहे.

ख्रिसमसच्या काळात रंगीत दृष्य इथे बघायला मिळतात

ख्रिसमसच्या दिवशी वाराणसीच्या या चर्चमध्ये वेगवेगळे रंग पाहायला मिळतात . एक अनोखा चेहराच या चर्चमध्ये बघायला मिळतो. ख्रिसमसवर चर्च आकर्षकपणे सजवले जाते हे आकर्षक रंग पाहण्यासाठी सर्व शहरातून लोक येथे येतात. संपूर्ण अर्धा किलोमीटर पर्यंत यांत्रेसारखे वातावरण तयार होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com