उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

आज (मंगळवार)सकाळी व्यंकय्या नायडू यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांनी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली- भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज (मंगळवार)सकाळी व्यंकय्या नायडू यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांनी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत स्वत: ट्विट करत व्यंकय्या नायडू यांनी ही माहिती दिली आहे. नायडूंना कोणतीही  लक्षणे अद्याप दिसलेली नाहीत. त्यामुळे त्यांनी घरीच स्वत:ला विलग करून घेतले आहे. त्यांची  प्रकृती ठणठणीत असून नायडू यांच्या पत्नीचीही यावेळी चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल मात्र, नकारात्मक आला असून त्यांनी स्वत:ला अलग करून घेतले आहे.

 

संबंधित बातम्या