Vice-Presidential Election: तृणमूल काँग्रेसच्या 2 खासदारांनी धुडकावला ममता बॅनर्जींचा आदेश

TMCच्या 2 खासदारांनी ममता बॅनर्जींचा आदेश धुडकावला आणि उपराष्ट्रपती निवडीसाठी आपले मतदान केले.
Vice-Presidential Election
Vice-Presidential ElectionDainik Gomantak

Vice-Presidential Election : आज भारताच्या उपराष्ट्रपती निवडीसाठी मतदान दान पार पडले आणि त्याचबरोबर कोणत्या पक्षाने किती मतदान केले याची आकडेवारी समोर आली आहे. या निवडणूकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांचा पक्ष तृणमूल कांग्रेस (TMC) उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करणार नाही असे ठरले होते. मात्र असे झाले नाही, TMCच्या 2 खासदारांनी ममता बॅनर्जींचा आदेश धुडकावला आणि उपराष्ट्रपती निवडीसाठी आपले मतदान केले. (Vice Presidential Election 2 MPs of Trinamool Congress defied Mamata Banerjee order)

Vice-Presidential Election
Vice-Presidential Election: NDA उमेदवार जगदीप धनखड विजयी; 11ऑगस्टला होणार शपथविधी

बाप लेकाने कोणाला मतदान केले याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून दोघांनीही पक्षाच्या सूचनेनुसार उमेदवाराला मतदान केल्याचा दावा केला जात आहे, पण त्याचवेळी शिशिर अधिकारी यांनी सोमवारी दावा केला की द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत. शिशिर अधिकारी स्पष्टपणे म्हणाले की, "द्रौपदी मुर्मू सर्वोत्तम उमेदवार आहेत." इतकेच नाही तर शिशिर यांनी उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखड यांना बंगालला मिळालेला 'सर्वोत्तम गव्हर्नर' म्हणून देखील संबोधले आहे.

उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. परंतु, अल्वा यांचे नाव लोकशाहीपद्धतीने निवडण्यात आले नाही, असा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला होता. तृणमूलच्या अनेक खासदारांचे देखील हेच मत असल्यामुळे पक्षाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले होते.

दुसरीकडे एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) पश्चिम बंगाचे राज्यपाल म्हणून काम करत असताना पक्षपाती भूमिका घेतल्यामुळे तृणमूलने त्यांनाही पाठिंबा दर्शविला नाही. शिवाय विरोधी पक्षाचा उमेदवार निवडताना तृणमूल काँग्रेसला विश्वासात घेतले नसल्यामुळे आम्ही तटस्थ राहणार असल्याची भूमिका तृणमूलने घेतली होती.

जगदीप धनखड यांनी 2019 मध्ये पश्निच बंगालच्या राज्यपाल पदाची सुत्रे हाती घेतली होती. त्यावेळीपासून धनखड यांचे ममतांच्या सरकारसोबत नेहमीच खटके उडायचे. या वादामुळे ममता आणि धनखड कायम चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे तृणमूल धनखड यांना पाठिंबा देणार नाही हे निश्चित झाले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा अल्वा यांना पाठिंबा न देण्याचा निर्णय विरोधी पक्षाला मोठा धक्का देणारा होता.

Vice-Presidential Election
Indian Army: ड्रॅगन घाबरणार, पाकिस्तानला घाम फुटणार! भारतीय बॉर्डरवर AI यंत्रणा तैनात

दरम्यान आज झालेल्या निवडणूकीत मात्र तृणमूलने ठरवले होते ते सगळे उलट झाले. ममतांना बैठकीत सांगितले असताना, कंठीचे तृणमूल खासदार शिशिर अधिकारी आणि त्यांचा पुत्र तमलूकचे खासदार दिव्येंदू अधिकारी यांनी दिल्लीमध्ये जाऊन संसदेत मतदान करत ममतांना मोठा धक्का दिला आहे. भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांनी संयुक्त विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला आहे. दरम्यान 11 ऑगस्ट रोजी धनखड यांचा शपथविधी होणार आहे.

तृणमूल काँग्रेसने अध्यक्षपदासाठी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला असून पक्षाच्या खासदार आणि आमदारांना कोलकाता विधानसभेत मतदान करण्याचे निर्देश देखील दिले आहेत, मात्र भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी आणि त्यांचे बंधू दिव्येंदू अधिकारी यांनी पक्षाला नकार दिला असून त्यांच्या सूचनेविरुद्ध संसदेत मतदान केले आहे.

टीएमसीने शिशिर अधिकारी आणि दिव्येंदू अधिकारी यांच्यात अंतर केले

शिशिर अधिकारी आणि दिव्येंदू अधिकारी हे तृणमूलचे खासदार असले तरी ते आता पक्षापासून दुरावले गेले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही शिशिर अधिकारी भाजपच्या व्यासपीठावर दिसून आले होते. पण ते स्वीकारण्यास नकार देत आहेत. सोमवारी ते म्हणाले की, मी कधीही कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात घेतलेला नाही. मी अनेक गोष्टींसह टीएमसीमध्येच आहे. जे खरे पक्षाचे लोक आहेत तेच खरे बोलतील मला जबाबदारी, कर्तव्य माहिती आहेत. कोण काय बोलले याची मला पर्वा नाहीये.

" या प्रश्नाच्या उत्तरात शिशिर अधिकारी म्हणाले की, “बोलणे, जबाबदारी, पक्षशिस्त – मला या वयात हे सर्व शिकवण्याची गरज नाहीये! हे गुप्त मतदान आहे. मी एक मार्ग सांगितला आणि दुसरा मार्ग दिला तर कोणालाच समजणार नाहीये, पण काही लोकांना बोलण्याची संधी मिळत असते. आमच्या कुटुंबाबद्दल खूप कथा आहेत. आणखी एक कथा जोडली. मला दु:ख नाही, मला जे माहीत आहे ते मी करतो मला जे समजते तेच मी करतो." दिल्लीत येण्यामागे कोणताही राजकीय अजेंडा किंवा षडयंत्र नसल्याचा दावाही या ज्येष्ठ खासदाराने यावेळी केला आहे.

Vice-Presidential Election
UPच्या शीख महिलेची USमध्ये आत्महत्या, मृत्यूपूर्वी पतीवर केले गंभीर आरोप

TMC म्हणाला - दोन बोटींवर स्वार

सोमवारी मतदान केल्यानंतर शिशिर अधिकारी यांनी पक्षाच्या सूचनेनुसार यशवंत यांना मतदान केल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र त्यानंतरही तृणमूलने माझ्यावर टीका करणे थांबवले नाही. पक्षाचे प्रवक्ते आणि प्रदेश सरचिटणीस कुणाल घोष म्हणाले की, “त्यांना पक्षविरोधी कायद्याची चांगलीच जाणीव आहे आणि म्हणूनच प्रत्येकजण असे म्हणत आहे. ते दोन बोटींचे राजकारण करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com