Viral Video: माणूस म्हणावं की बकासूर? 2 मिनिटात केलं 10 जणांचे जेवण फस्त

महाराजा थाळीबाबतची पैज दुकानदार हरला; बक्षीस म्हणून द्यावे लागले 3100 रूपये
Viral Video
Viral VideoDainik Gomantak

Viral Video: सोशल मीडियात अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यात फूड चॅलेंज व्हिडिओदेखील असतात. यात एखाद्या दुकानदाराने एखादा पदार्थ, एखादी थाळी ठराविक वेळेत खाण्याचे चॅलेंज दिलेले असते. आणि ते चॅलेंज पुर्ण केल्यास बक्षीसही दिले जाते. अनेक हौशी लोक असे चॅलेंज स्विकारत असतात, आणि अनेकांना यात यशही येते. अशाच एका चॅलेंजचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

Viral Video
Navratri Festival 2022: नवरात्रीमध्ये आवर्जून करा या भाज्यांचे करा सेवन

या व्हायरल व्हिडिओत दुकानदाराने दोन मिनिटात महाराजा थाळी खाण्याचे चॅलेंज दिले होते. ही महाराजा थाळी नावाप्रमाणेच आहे. यात दोनच पदार्थ असले तरी त्याचे प्रमाण जास्त आहे. एका मुलाने ते चॅलेंज स्विकारले. दुकानदाराने त्या मुलाला आधीच कल्पना दिली की, यापुर्वी दहा जणांनी यात सहभाग घेतला होता, पण त्यांना हे चॅलेंज पुर्ण करता न आल्याने हार मानली आहे. आणि पराभूत झाल्याने त्यांना प्रत्येकी 500 रूपये मला द्यावे लागले आहेत.

Viral Video
उपवासात Constipation ची समस्या दूर करण्यासाठी 'हे' उपाय ट्राय करा

त्यानंतर मुलगा दुकानदाराकडे गेला. दुकानदाराने त्याला अत्यंत उत्साहाने महाजारा थाळी तयार करून दिली. या थाळीत फ्राईड राईस, मंचुरियन हे दोनच मेन्यू होते. तो मुलगा आणि त्याचा एक साथीदार ही थाळी खायला सुरुवात करतात. आणि बघताबघता दोन्ही हातांनी मोठमोठे घास घेत ते काही वेळातच दहा जणांसाठीचे हे जेवण फस्त करतात. विशेषम्हणजे निर्धारित वेळेआधीच हे चॅलेंज त्यांनी पुर्ण केले. हे पाहून त्या दुकानदारालाही आश्चर्य वाटले असून बक्षीस म्हणून दुकानदाराने 3100 रूपये त्या मुलाला दिले. ARE YOU HUNGRY नावाने हा व्हिडिओ युट्युबवर पाहता येईल. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून आत्तापर्यंत या व्हिडिओला 8 लाखाहून अधिक व्हयुज मिळाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com