Video: पैगंबरांबाबत वादग्रस्त वक्तव्य; अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा देण्यास विद्यार्थ्याला पाडलं भाग

Hyderabad: हिमांक बन्सल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
Student
StudentDainik Gomantak

Hyderabad: हैदराबादमधील कॉलेजच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपावरुन 1 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्याला त्याच्या वसतिगृहातील मित्रांनी बेदम मारहाण केली होती. हिमांक बन्सल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो हैदराबादमधील IFHE इथे कायद्याचे शिक्षण घेत आहे. सध्या तो अंडर ग्रॅज्युएशनमध्ये आहे.

दरम्यान, शनिवारी या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हिडिओमध्ये, हैदराबादमधील ICFAI फाउंडेशन फॉर हायर एज्युकेशन (IFHE) चा विद्यार्थी हिमांक बन्सल याला संस्थेच्या इतर विद्यार्थ्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याला 'अल्लाह-हू-अकबर'चा नारा देण्यास भाग पाडले. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचा एक गट वसतिगृहाच्या खोलीत बन्सल याला मारहाण करताना आणि धमकावताना दिसत आहे.

Student
Karnataka: 'त्याला' करायचा होता सेक्स, पण महिलांच्या मृतदेहांचे नग्न फोटो काढून...

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थ्याने 11 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीत त्याने म्हटले की, "1 नोव्हेंबर रोजी कॉलेज कॅम्पसमधील वसतिगृहातील एका खोलीत मला मारहाण करण्यात आली. माझ्यावर 15 ते 20 जणांनी हल्ला केला." तक्रारीत पुढे म्हटले की, इतर विद्यार्थ्यांनीही कथितपणे मारहाण केली आणि गैरवर्तन केले.

दुसरीकडे, कथित हल्ल्याचे व्हिडिओ आणि फोटो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आले होते. तक्रारीत विद्यार्थ्याने पुढे आरोप केला की, माझ्या चेहऱ्यावर जखमा होत्या. शिवाय, माझे डोळे आणि नाक सुजले होते.

Student
Karnataka: बहिणीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी, चाकूने 70 वार करत तरुणाची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी (Students) त्याला धमक्याही दिल्या होत्या. तत्पूर्वी, पीडित विद्यार्थ्याने IFHE अधिकार्‍यांना पत्र लिहून आरोपींविरुद्ध शारिरीक हल्ला आणि जीवे मारण्याची धमक्या देण्याची औपचारिक तक्रार नोंदवली.

Student
Karnataka: मी मुख्यमंत्री पद सोडतो पण...

पत्रानुसार, पीडित विद्यार्थ्याने एका मैत्रिणीसोबत बोलताना प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली. मात्र, जेव्हा इतर विद्यार्थ्यांना याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी तेलंगणा प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग कायद्याच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com