VIDEO: पत्त्यासारखी कोसळली शिमल्यात आठ मजली इमारत

ही घटना शिमल्यातील हाली पॅलेसजवळ घोडा चौकी येथे संध्याकाळी 5.45 वाजता घडली.( Building Collapse In Shimla)
Video: Multi storey Building Collapse In Shimla at Himachal Pradesh
Video: Multi storey Building Collapse In Shimla at Himachal PradeshDainik Gomantak

हिमाचल प्रदेशची (Himachal Pradesh) राजधानी शिमला (Shimla) येथे गुरुवारी संध्याकाळी आठ मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली आहे (Building Collapse In Shimla ) .ही बहुमजली इमारत कोसळल्याचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालक सुदेश कुमार मोक्ताने सांगितले की, ही घटना शिमल्यातील हाली पॅलेसजवळ घोडा चौकी येथे संध्याकाळी 5.45 वाजता घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नुकत्याच झालेल्या पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे इमारत कोसळली, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. बाहेरील दरीतील काचीघाट परिसरातील नाजूक डोंगर उतारावर वसलेली ही इमारत जमिनीवर कोसळण्याच्या काही तास आधी स्थानिक प्रशासनाने रिकामी केली होती.(Video: Multi storey Building Collapse In Shimla at Himachal Pradesh)

शिमला महापालिकेने 15 दिवसांपूर्वीच इथे राजनच्या कुटुंबांना ही धोकादायक घरे लवकरात लवकर रिकामी करण्यास सांगितले होते. काही कुटुंबांनी मात्र इमारतीच्या संभाव्य कोसळण्याच्या इशाऱ्यांवर विश्वास ठेवला नाही आणि त्याच इमारतीत राहण्याचा आग्रह धरला.स्थानिक मंत्र्यांच्या मते या परिसरातील धोकादायक असलेल्या जवळपासच्या इमारती प्रशासनाने रिकामी केल्या आहेत. येथे आलेल्या 8-10 कुटुंबांना इतर ठिकाणी पुनर्वसनासाठी दिलासा दिला जाईल.

हा संभाव्य धोका लक्षात घेऊन सहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने या परिसरात तीन मजल्यांवर इमारत बांधण्यासाठी इमारतींच्या उंचीवर मर्यादा घातली होती.पण अजूनही हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शहरात पाच ते 12 मजली इमारती आहेत.हरातील रहिवाशांना स्पष्ट धोका असूनही, राज्य सरकार एनजीटीच्या आदेशांविरोधात लढत आहे आणि डोंगरावरील इमारत मालकांना 'मदत' देण्याची मागणी करत आहे.

Video: Multi storey Building Collapse In Shimla at Himachal Pradesh
पाच वर्षांच्‍या मुलांसाठी मिळणार 'बाल आधार कार्ड'

काहीदिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे किन्नौर आणि शिमला जिल्ह्यात भूस्खलन झाले होते . यामुळे किन्नौर जिल्ह्यातील पुवारी ते काझा हा हा राष्ट्रीय महामार्ग देखील बंद होता. बिलासपूरमधील नैना देवीमध्ये 180.6 मिमी आणि सोलनमधील कांदाघाटमध्ये 65.2 मिमी पाऊस झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com