कोलकत्याच्या रेड रोडवर दोन वर्षांनी ईदची नमाज अदा; ममता बँनर्जींचा PM मोदींवर निशाणा

देशाची स्थिती चांगली नाही, ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
कोलकत्याच्या रेड रोडवर दोन वर्षांनी ईदची नमाज अदा; ममता बँनर्जींचा PM मोदींवर निशाणा
Mamata BanerjeeDainik Gomantak

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ईदच्या (Eid al-Fitr) पावन पर्वावर राज्यातील जनतेला संबोधित केले . यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'देशाची स्थिती चांगली नाही. आम्ही तुला रडताना पाहू शकत नाही. आम्हाला घाबरण्याची गरज नाही, लढायचे आहे. आपल्याला शांततेबद्दल बोलायचे आहे. एकत्र लढायचे आहे. बंगालमध्ये सर्वोच्च एकता आहे. आम्ही डरपोक नाही, आम्हाला कसे लढायचे ते माहित आहे. देशात एकाकीपणाचे राजकारण सुरू आहे. हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडण होत आहे,' असे कोलकात्याच्या रेड रोडवर लोकांना संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Mamata Banerjee
ईद मुबारक! देशभरात ईद उल फित्र उत्साहात साजरा केला जातोय

दरम्यान ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून लोकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. 'सर्वांना खूप आनंद, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा, आमचे ऐक्य आणि सौहार्दाचे बंध अधिक दृढ होवोत ही प्रार्थना. अल्लाह सर्वांना आशीर्वाद देईल,' असे ट्विट करण्यात आले आहे. आज ईद-उल-फित्रचा सण देशात शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. पारंपारिक पद्धतीने मुस्लिम समाजाच्या लोकांनी पहाटे नमाज अदा केली. यासाठी विविध शहरांमध्ये प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यातबरोबर संवेदनशील ठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत.

Mamata Banerjee
ईदपूर्वी लाऊडस्पीकर लावण्यावरून गोंधळ, लाठी-काठीहल्ल्यानंतर इंटरनेट सेवा बंद

ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'आज देशात सुरू असलेले फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण योग्य नाही. देशात एकटेपणाचे राजकारण सुरू आहे, तेही चांगले नाही. आम्हाला एकता हवी आहे, हम सारे जहां से अच्छा हिन्दोस्तां हमारा चाहते हैं, असे म्हणत बॅनर्जी यांनी राज्यातील जनतेला एकतेचा संदेश दिला. एकजिटीने राहण्याचा नारा दिला. दोन वर्षांनंतर कोलकाता येथील रेड रोडवर ईदची नमाज अदा करण्यात आली. 2020 आणि 2021 मध्ये कोरोना व्हायरसमुळे येथे नमाज अदा करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.