Video: अचानक पूर्णागिरि जनशताब्दी एक्सप्रेस उलट दिशेने का धावली?

Video: अचानक पूर्णागिरि जनशताब्दी एक्सप्रेस उलट दिशेने का धावली?
Video Purnagiri Jan Shatabdi Express run in the backward at full speed

देहरादून : उत्तराखंड येथे काहीच दिवसांपूर्वी दिल्लीहून देहरादूनला येणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसला आग लागल्याची घटना समोर आली होती. ज्यानंतर बुधवारी दिल्लीहून टनकपूरला येणाऱ्या पूर्णागिरि जनशताब्दी एक्सप्रेसचा (Purnagiri Jan Shatabdi Express) एक मोठा अपघात होता-होता टळला. पूर्णागिरि जनशताब्दी एक्सप्रेस टनकपुर स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी विरुद्ध दिशेने धावली. त्यानंतर ट्रेनच्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला तसेच, रेल्वे विभागातही खळबळ माजली. 

रेल्वेने घाईघाईत अलर्ट जारी करत टनकपूर ते खटिमापर्यंतचे फाटक बंद केले. ट्रेन टनकपूर ते चकरपूरपर्यंत विरुद्ध दिशेत वेगाने काही किलोमीटरपर्यंत धावली. या सर्व प्रकारात प्रवासी आणि ट्रेनला कुठल्याच प्रकारचे काही नुकसान पोहोचले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. तर, या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली नॉर्दन रेल्वेने लोकोपायलट आणि गार्डला निलंबित करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी जवळपास चारवाजताच्या सुमारास होम सिग्नलजवळ एक गाय ट्रेनखाली आली. त्यानंतर ट्रेन थांबली आणि ट्रेनचं इंजिन आणि ब्रेकने काम करणे थांबवले आणि ट्रेन विरुद्ध दिशेने धावली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com