मथुरा मंदिरात पुजाऱ्याने मास्क घालण्याचे आवाहन करताच हसले लोकं; पहा व्हिडिओ

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

मथुरेच्या मंदिरातून एक व्हिडिओ समोर आला आहे. येथे श्री बांकेबिहारी जी मंदिराबाहेर लोक प्रचंड गर्दी करत आहे. एकमेकांना लोटत उभे आहे. आणि सोशल डिस्टंन्सचा तर पूर्णपणे फज्जाच उडालेला दिसत आहे.

मथुरा: उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत 9695 नवीन कोरोना प्रकरणांची नोंद जाली आहे. अशा परिस्थितीत जनतेने कोरनाच्या हाताबाहेर जात असलेल्या प्ररिस्थितीकडे गंभीररीत्या बघितलं पाहिजे. मात्र याच्या उलट परिस्थिती उत्तर प्रदेश च्या एका मंदिरात बघायला मिळाली आहे. मथुरेच्या मंदिरातून एक व्हिडिओ समोर आला आहे. येथे श्री बांकेबिहारी जी मंदिराबाहेर लोक प्रचंड गर्दी करत आहे. एकमेकांना लोटत उभे आहे. आणि सोशल डिस्टंन्सचा तर पूर्णपणे फज्जाच उडालेला दिसत आहे. जेव्हा मंदिराच्या एका पुजार्‍याने हे पाहिले तेव्हा त्यांनी लोकांना मास्क लावून सोशल डिस्टंन्स आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. परंतु लोकांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. आणि पुजाऱ्याच्या या आवाहनावर हसताना दिसले.

चार राज्यातील मतदानांनंतर निवडणूक आयोगाला आली जाग 

पुरोहित व्हिडिओमध्ये असे म्हणतात की, कोरोना व्हायरसचा वाढता प्रवाह पाहता आपण मास्क लावा, तर त्यांच्या या आवाहनावर गर्दीतील काही लोक हसतांना दिसले. आपण आत्ता हसत आहात. परंतु घरच्या लोकांना तुमच्या या निष्काळजीपणाचे परिणाम भोगावे लागतील, असे पुजारी म्हणत आहेत. या व्हिडिओमध्ये बाहेर प्रचंड गर्दी दिसत आहे. 

चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी माउंटन स्ट्राईक कॉर्प्स जवान 

सॅंम्पल घेतांना निष्काळजीपणा
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमिवर कोरोना चाचण्यांमध्ये मोठा निष्काळजीपणा दिसून आला आहे. कानपूर मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागाकडे पाठविलेल्या नमुन्यांमध्ये 650 बेकार होते. सीएमओने आता हे सॅम्पल पुन्हा पाठविण्यास सांगितले आहे.
 

संबंधित बातम्या