VIDEO: पत्त्यांच्या बंगल्यासारखाच ढासळला NH-415

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 जून 2021

अरुणाचल प्रदेशचा हा व्हिडिओ  बरेच काही सांगतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी इटानगरमध्ये मुसळधार पावसामुळे एनएच-415 चा एक भाग वाहनांची ये-जा सुरू असतांना कोसळला.

इटानगर: सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात नैसर्गिक कहर कायम आहे. देशात सध्या एका बाजूला कोरोना महामारी संकट उभे असतानाच दुसऱ्या बाजूला देव महाकाय चक्रीवादळाचा सुद्धा संकटाशी जोडतोय आत्ताच काही दिवसांपूर्वी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच महाराष्ट्र गोवा कर्नाटक या राज्याच्या सागरी किनारपट्टीवर वादळाने थैमान घातलं. या आपत्तीमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आता अरुणाचल प्रदेशचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग कोसळला. ज्याने हे दृश्य पाहिले, त्याच्या अंगावर काटा उभा राहीला असेल. (VIDEO Viral Arunachal Pradesh A portion of the National Highway 415 collapses )

केंद्रीय शिक्षणमंत्री एम्स रुग्णालयात दाखल, बारावीचा निर्णय लांबणीवर 

अरुणाचल प्रदेशचा हा व्हिडिओ  बरेच काही सांगतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी इटानगरमध्ये मुसळधार पावसामुळे एनएच-415 चा एक भाग वाहनांची ये-जा सुरू असतांना कोसळला. मातीचा थर साचल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर खूप दबाव आला. आणि भिंत कोसळली. ही भिंत कोसळल्याने रस्त्याचा मधोमध भाग बाजूला झाला. या दरम्यान घटनास्थळी उपस्थित लोकांनी हा देखावा कॅमेऱ्यामध्ये कैद केला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहून आपल्याला कल्पना येवू शकते की ही भिंत कोसळल्याने किती मोठा अपघात घडू शकला असता. परंतु, सुदैवाने यात कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. ज्याने हा व्हिडिओ पाहिला तो चकित झाला. लोक या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. या अपघाताबाबत काहीजण सरकारला टोमणे मारत आहेत. तर काही लोक याला नैसर्गिक कहर म्हणून संबोधत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणास काय वाटते, कमेंट करा आणि सांगा.

LOCKDOWN: पाहा वेगवेगळ्या राज्यातील लॉक-अनलॉक परिस्थिती 

संबंधित बातम्या