भारतीय जवानही म्हणाले, "पावरी हो रहे हैं"... व्हिडिओ व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

हिमाच्छादित पर्वतांमध्ये गस्त घालताना भारतीय लष्कराच्या सैनिकांनी पावरी व्हिडिओ करत एंजॉय केले आहे.  या दोन  भारतीय सैनिकांनी त्यांची #Pawri ची मजेदार व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर शेअर केली आहे.

जम्मू काश्मीर: पाकिस्तानी इंफ्लुएंसर दनानीर मुबीनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर युजर्सच्या खूपच पसंतीस उतरला आहे. 'हे आम्ही आहोत, ही आमची कार आहे आणि ही आमची पावरी होत आहे' हा अशा स्वरूपाचा व्हिडिओ आल्यापासून या व्हिडिओने सोशल मीडियावर धूम ठोकली आहे. प्रत्येकजण या व्हिडिओचे स्वतःचे नवनवे वर्जन तयार करत आहे. आता पावरी ट्रेंडमध्ये भारतीय लष्कराचे जवानांचेही नाव जोडले गेले आहे.

हिमाच्छादित पर्वतांमध्ये गस्त घालताना भारतीय लष्कराच्या सैनिकांनी पावरी व्हिडिओ करत एंजॉय केले आहे.  या दोन भारतीय सैनिकांनी त्यांची #Pawri ची मजेदार व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये ते, 'हे आम्ही आहोत, ही आमची बंदूक आहे आणि ही आमची गस्त होत आहे,' असे म्हणत हा व्हिडिओ भारतीय जवानांनी शेअर केला आहे. भारतीय सैन्याच्या जवानांचा हा पवारी व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

भारतीय लष्कराच्या पावरी व्हिडिओला लोकं सोशल मीडियावर खूप पसंत करत आहेत. सैनिकांच्या या मजेदार शैलीचा लोक आनंद घेत आहेत. युजर्स हा व्हिडिओ एकमेकांनाच शेअर करत आहेत आणि त्यावर  मजेदार कमेंट देत आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करत ​​आहेत.

संबंधित बातम्या