संतापलेल्या हत्तीची बसच्या दिशेने धाव; पर्यटकांची उडाली घाबरगुंडी..व्हिडिओ व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

वन्य प्राण्यांशी संबंधित बरेच व्हिडिओ इंटरनेटवर दररोज व्हायरल होतात. बर्‍याच वेळा या व्हिडिओंमध्ये प्राणी आणि मानवांचे प्रेम दाखवले जाते, तर काही वेळा प्राण्यांचा रागही दिसून येतो. 

बंदिपूर: वन्य प्राण्यांशी संबंधित बरेच व्हिडिओ इंटरनेटवर दररोज व्हायरल होतात. बर्‍याच वेळा या व्हिडिओंमध्ये प्राणी आणि मानवांचे प्रेम दाखवले जाते, तर काही वेळा प्राण्यांचा रागही दिसून येतो. जंगलात मानवांचा वाढता हस्तक्षेप प्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहे. प्राण्यांनाही हा ह्स्तक्षेप कधी कधी नकोसा होतो. हेच कारण आहे की बर्‍याच वेळा जंगलात फिरणारे लोक प्राण्यांच्या या रागाला बळी पडतात.

असाच एक जंगलातील सफारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसते की बसमध्ये बसलेले काही लोक जंगलात फिरत होते. तेवढ्यात एक मोठा हत्ती जोरात बसच्या दिशेने धावू लागला. हे दृश्य पाहून बसमध्ये बसलेले सर्व लोक घाबरून गेले. बसचालकाने हत्तीला आपल्याकडे येताना पाहिले आणि ताबडतोब बस मागे घेण्याचा प्रयत्न केला.

सोशल मिडिया वापरण्याचे हे नवे नियम माहिती आहेत का? 15 एप्रिलपासून होणार लागू 

या व्हिडिओमध्ये पाहता येईल की बसमध्ये बसलेले सर्व लोक रागावलेला हत्ती आपल्याकडे येताना पाहून घाबरून गेले होते.  हत्ती थोड्या वेळाने मागे हटल्याने कोणाचेही नुकसान झाले नाही. परंतु व्हिडिओ पाहून हे स्पष्टपणे दिसते आहे की आपल्या घरात (जंगलात) दुसर्‍या व्यक्तीला पाहून हत्तीलाच भीती वाटली असावी. म्हणून त्याने इतर लोकांना त्याच्या घरातून दूर जायला लावले असावे.

राजस्थान फिरायचंय? मग भारतीय रेल्वेच्या या पॅकेजेसचा नक्की विचार करा 

जंगलात मानवांच्या वाढत्या हालचालींमुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वन्यजीव शास्त्रज्ञ, वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणतज्ज्ञ देखील वन्यजीवांच्या वेगाने कमी होणाऱ्या संख्येमुळे चिंतेत आहेत. विकासाच्या आंधळ्या शर्यतीत जंगले खूप वेगाने कापली जात आहेत, परिणामी जंगलांच्या प्राण्यांना असुरक्षित वाटू लागते आणि म्हणूनच प्राण्यांचा राग कधीकधी मानवांवर उमटत जातो.

 

संबंधित बातम्या