बघा निसर्गप्रेमींचा इकोफ्रेंडली वेडिंग सोहळा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

एक लग्न सोहळा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, आणि त्या नववधूवरांचे कौतूकही होत आहे. या साधेपणाने केलेल्या लग्नाने लोकांची मने जिंकली आहेत. ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

नवी दिल्ली: बहुतेकदा लोक लग्नात बराच खर्च करण्याचा प्रयत्न करतात आणि लग्न एवढ्या थाटामाटात करतात की, ते लोकांनी नेहमीच आठवणीत रहावं असं. परंतु असेही काही लोक आहेत ज्यांना लग्नात अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने लग्न करायचे असते, कारण त्यांना लग्नात अतिरिक्त पैसे खर्च करणे हे पैशांचा अपव्यय असल्याचे वाटते. असाच एक लग्न सोहळा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, आणि त्या नववधूवरांचे कौतूकही होत आहे. या साधेपणाने केलेल्या लग्नाने लोकांची मने जिंकली आहेत. ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हे फोटो आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहेत, ज्यात त्यांनी “जेव्हा नवरदेव घोड्यावर किंवा कारमध्ये नाही तर इलेक्ट्रिक बाईक वर आला आणि वधूने वरांला तुळशीची वरमाला घातली होती, एक अप्रतिम इको वेडिंग. माधुरी आणि आदित्य तुमचे खूप अभिनंदन शुभेच्छा! ”असे कॅप्शन त्यांनी त्या फोटोला दिले आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, फोटोत दिसणाऱ्या कपलचे नाव माधुरी आणि आदित्य आहे. हे दोघे शालेय मित्र आहेत, जे आता लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. हे दोघेही निसर्गप्रेमी 'नेचर लवर' असल्याचे सांगण्यात येत आहे. यांच्या लग्नात जास्तीत जास्त सजावटीपासून ते शोच्या बहुतेक गोष्टी इको फ्रेंडली आणि रीसायकल होत्या. त्याहूनही विशेष गोष्ट म्हणजे नवरदेवाने आपल्या इलेक्ट्रिक बाइकवरून मंडपात प्रवेश केला. आणि वधू-वरांनी तुळशीच्या पानांनी तयार केलेली वरमाला एकमेकांना घातली.
 

संबंधित बातम्या