चीन बॉर्डरवर भारतीय जवानांचा डान्स; लोकं पडले प्रेमात तर केंद्रिय मंत्र्यांनी केलं कौतुक Video Viral

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मार्च 2021

केंद्रिय मंत्री किरण रिजिजू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात भारतीय सैनिक पॅंगॉन्ग तलावाजवळ नाचत आहेत आणि मस्त एंजॉय करतांना आणि बिनदास्त नाचतांना दिसत आहे.

लडाख: भारतीय जवान फक्त सिमेवरच नाही तर आपल्या खाजगी आयुष्यात देखिल उत्कृष्ठ व्यक्तिमच्व आहे. देशासाठी काम करत असतांना त्याच्यातला कलाकार देखिल जिवंत असल्याचे नेहमिच आपल्याला बघायला मिळतो. अशी एक कला भारतीय जवानांनी लडाखमध्ये छान डान्स केला आहे. आणि लोकांनी त्या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

लडाखमध्ये काही दिवसांपूर्वी पॅंगॉन्ग त्सो तलावाजवळ भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये तणाव होता. आता त्याच सिमेवरून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. केंद्रिय मंत्री किरण रिजिजू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात भारतीय सैनिक पॅंगॉन्ग तलावाजवळ नाचत आहेत आणि मस्त एंजॉय करतांना आणि बिनदास्त नाचतांना दिसत आहे.

मॉडर्न ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या अध्यक्षांची मालमत्ता जप्त; बनावट पदवी प्रकरण भोवले

तेव्हा तरूण जवान असे आनंद घेतात तेव्हा ही एक चांगली बाब आहे. पॅंगॉन्ग त्सो तलावाजवळ बहादूर भारतीय आर्मीचे जवान आपल्याला साथिदारांसह नाचतांना दिसत आहे.दोन जवान नाचत आहे आणि इतर जवान त्यांना प्रोत्साहन देत आहे.
चीनसोबत झालेल्या करारानंतर  पॅंगॉन्ग त्सो तलावावर असणारा धोका कमी झाला आहे. पण तो पूर्णपणे कमी झालेला नाही.  केंद्रिय मंत्री किरण रिजिजू यांनी हा व्हिडिओ शेअर करत भारतीय जवानांचे कौतुक केले आहे.

आज सर्वोच्च न्यायालयाने टाटा सन्सच्या बाजूने निकाल दिला आहे..

संबंधित बातम्या