व्हिडिओ व्हायरल: मंदिरात पाणी पिण्यासाठी गेला होता मुलगा; पण आडवा आला धर्म

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

राष्ट्रीय राजधानी दिल्ली ला लागून असलेल्या गाझियाबादमधील मंदिरात पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका मुस्लिम मुलाला मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

गाझियाबादः राष्ट्रीय राजधानी दिल्ली ला लागून असलेल्या गाझियाबादमधील मंदिरात पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका मुस्लिम मुलाला मारहाण केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका मुलाने एका मुस्लिम मुलाला मारहाण केल्याचे दिसत आहे.

शनिवारी पोलिसांनी ही माहिती दिली आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंग यांनी आपल्या ट्विटर हँडलवर व्हिडिओची एक क्लिप सामायिक करून हा मुद्दा उपस्थित केला होता. व्हिडिओमध्ये आरोपी व्यक्ती मुस्लिम मुलाचे नाव विचारत आहे आणि धार्मिक ठिकाणी प्रवेश का आणि कसा केला अशी विचारपूस करतांना दिसत आहे. त्यानंतर लवकरच तो मुलाला शिवीगाळ आणि मारहाण करतांना दिसतो.

वरिष्ठ पोलिस अधीक्षक कलानिधि नैथानी यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री पोलीसांनी त्या  आरोपीला अटक केली. त्याचे नाव श्रंगी नंदन यादव असून त्याची चौकशी केली जात आहे. ते म्हणाले की असे उपक्रम खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारच्या प्रकरणावर लवकरच कारवाई केली जाईल. 

संबंधित बातम्या