अमानुषपणाचा कळस! गर्भवती महिलेची काढली धिंडं; व्हिडिओ व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

नवरा सोडून गेल्याने ती महिला एका दुसर्‍या पुरुषाबरोबर राहत होती म्हणून संतापलेल्या सासरच्यांनी महिलेची भर रस्त्यावरून मिरवणूक काढली.

इंदौर: मध्य प्रदेशातील गुना येथे गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नवरा सोडून गेल्याने ती महिला एका दुसर्‍या पुरुषाबरोबर राहत होती म्हणून संतापलेल्या सासरच्यांनी महिलेची भर रस्त्यावरून मिरवणूक काढली. सासरच्या लोकांनो बाईच्या खांद्यावर मुलगा बसला आणि तीन किलोमीटरच्या उंच रस्त्यावर अनवाणी फिरवलं. वाटेत त्या महिलेला काठीने मारहाण केली आणि तिला दगडं मारली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक पोलिसांनी सांगितले की, 9 फेब्रुवारी रोजी गुनातील एका खेड्यात एका महिलेशी गैरवर्तन केल्याची घटना घडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 15 फेब्रुवारी रोजी गांभीर्य दाखविले आणि पोलिसांनी पीडीत महिलेच्या कुटूंबातील सासरा आणि दोन दिरांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

अशा काही घडला प्रकार

ही गर्भवती महिला गुनाच्या बांसखेडी खेड्यातील रहिवासी होती. पीडितेने सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी पती सीताराम यांनी मला सांगई गावात सोडून इंदोरला गेला. नवरा निघताना म्हणाला की मी तुला यापुढे ठेवू शकत नाही, तू डेमा बरोबर रहा. नंतर माझे सासरे गुंजारिया वारेला, जेठकुमार सिंग, केपी सिंह आणि रतन यांनी येऊन मला घरी जाण्यास सांगितले. मी नकार दिल्यावर त्यांनी मला मारहाण करण्यास सुरवात केली. गावातील एक मुलगा माझ्या खांद्यावर बसला आणि मला सांगईहून बांसखेडी सासरच्या तीन किलोमीटर अनवाणी पायाने नेले. माझ्या पोटात पाच महिन्यांची गर्भ आहे. तरीही सासरा आणि मोठा भाऊ मला ओढतच राहिले. लाठी, काठीने, दगड, आणि  क्रिकेटच्या बॅट्सने माझ्या पायाला मारत राहिले. या दरम्यान नवऱ्याने फोन करून आपल्या घरच्यांना मला सोडून जाण्यास सांगितले पण त्याचे कोणीही त्यांचे ऐकले नाही.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये तीन महिने ते दोन वर्षाची शिक्षा होऊ शकते. गुनाच्या एसपीने सांगितले की, गुनातील गावकऱ्यांसमोर एका महिलेच्या खांद्यावर एक मुलगा बसलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीन जणांना अटक करण्यात आली आहे. एसपी म्हणाले की, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेसंबधी आणखी तपास करणे सुरू आहे. 

 

 

संबंधित बातम्या