योगी आदित्यनाथ यांचा अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल; जाणून घ्या नेमकं प्रकरण

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

योगी आदित्यनाथ माध्यमाशी बोलत असतानाच चिडलेल्या योगींनी समोरील व्यक्तिला अपशब्द वापरल्याचा आरोप केला जात आहे.

लखनऊ: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तापट स्वभावामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. योगी आदित्यनाथ यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  योगी आदित्यनाथ माध्यमाशी बोलत असतानाच चिडलेल्या योगींनी समोरील व्यक्तीला अपशब्द वापरला  असल्याचा आरोप केला जात आहे. समोरच्या व्यक्तीला अपशब्दाचा वापर केल्यामुळे योगींवर टिकाही होत आहे. तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला त्यानंतर ते माध्यमाशी बोलत होते. आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया देत असतानाच कॅमेरा हलल्यामुळे ते चिडले आणि त्यांनी व्हिडिओ पत्रकाराला अपशब्द वापरला. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी हा व्हिडिओ ट्विट करत योगी आदित्यनाथ यांच्यावर टिका केली. उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा खरा चेहरा. थोडा आवाज झाला म्हणून माध्यमाच्या कॅमेरामनला अपशब्द योगी देत आहेत, असे सूर्य प्रताप सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Video of Yogi Adityanath using abusive language goes viral)

 

Chattisgarh Naxal Attack: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घटनास्थळी भेट देणार;...

तर दुसरीकडे मुंबई युवक कॉंग्रेसनही हा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘’हा आहे अजय बिश्त यांचा खरा चेहरा आहे. माध्यमाच्या पत्रकाराला कॅमेऱ्यासमोरच अपशब्द वापरला आहे. साधूच्या वेशात दिसणाऱ्या या तथाकथित योगींच्या डोक्यामध्ये भरलेली अमर्यादा, असंस्कृतता, खालच्या पातळीवरील शब्दाबद्दल भाजपला भलेही अभिमान वाटेल, परंतु देश अपमानित झाला आहे,’’ अशी टिका युवक कॉंग्रेसने केली आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अपशब्द देतानाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डिलीट करण्यात आला. आणि सुधारीत व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘’अगोदर प्रसिध्द करण्यात आलेल्या थेट प्रतिक्रियेचा व्हिडिओ मागे घेण्यात आला आहे. या व्हिडीओत योगी आदित्यनाथ कोरोना लसीकरणासंदर्भात माहिती देत आहेत,’’ असं माध्यमाने म्हटलं आहे.  

तर योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार शेलाभ मनी त्रिपाठी यांनी सोशल मिडियावरील योगी आदित्यनाथ यांचे हे व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओच्या शेवटच्या काही सेकंदात बनावट ऑडिओ टाकण्यात आल्याचा दावा करत योगी आदित्यनाथ यांच्या माध्यम सल्लागारांनी ‘फॅक्ट चेक’ म्हणत पुन्हा काही फेक न्यूजचे ट्विट केले आहेत. 

 

 

संबंधित बातम्या