बिहार विधानसभा अध्यक्षपदी ‘एनडीए’चे विजय कुमार सिन्हा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीतही भाजपने बाजी मारली आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे उमेदवार विजय कुमार सिन्हा यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे.

पाटणा :  बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीतही भाजपने बाजी मारली आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे उमेदवार विजय कुमार सिन्हा यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे. महाआघाडीचे उमेदवार अवध बिहारी यांचा पराभव 
झाला. 

अध्यक्षपदाच्या निवडणुकीची संपूर्ण मतदान प्रक्रिया आज विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या गोंधळात पार पडली. हंगामी अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी मतदानापूर्वी प्रथम ‘एनडीए’चे उमेदवार विजय कुमार सिन्हा यांना समर्थन देणाऱ्या सदस्यांना व नंतर अवध बिहारी यांच्या बाजूच्या सदस्यांना हात वर करण्यास सांगितले. यावेळी १२६ आमदारांनी विजय कुमार सिन्हा यांच्या बाजूने तर ११४ आमदारांनी बिहारी यांना मत दिले. बिहारमध्ये ‘एनडीए’त मोठ्या भावाच्या  भूमिकेत असलेल्या ‘जेडीयू’ विधानसभेचे अध्यक्षपद नेहमी असे. मात्र या निवडणुकीत ७४ जागा मिळवत भाजप आता मोठ्या भावाच्या जागी आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जेडीयूकडे असलेले  अध्यक्षपदही भाजपकडेच आता आले आहे. 

अधिक वााचा :

चेन्नईत पावसाचा धुमाकूळ ; आज सार्वजनिक वाहतूकीवर बंदी

विविध कामगार संघटना, बॅंकांचा आज देशव्यापी संप ; शेतकरी संघटनांची ‘दिल्ली-चलो’ची हाक

 

संबंधित बातम्या