Chhattisgarh: 'मुस्लिम फेरीवाल्यांवर बहिष्कार घाला' गावकऱ्यांनी घेतली शपथ

व्हिडीओमध्ये लोक आपल्या गावात येणाऱ्या फेरीवाल्यांच्या धर्माची (Religion) चौकशी करण्यात येईल, असंही म्हणताना दिसत आहेत.
Villagers
VillagersDainik Gomantak

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) सुरगुजा (Muslim Venders Boycott) मधून एक विचित्र घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक मुस्लिम दुकानदारांवर बहिष्कार घालण्याची शपथ घेताना दिसत आहेत. त्याच वेळी, हे लोक म्हणत आहेत की, 'मुस्लिमांबरोबर असलेले व्यावसायिक व्यवहार टाळले पाहिजेत.' हा व्हिडिओ समोर येताच सदर पोलिस (Police) अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आरोपींचा शोधही सुरु करण्यात आला आहे.

दरम्यान, सरगुजा पोलिसांनी गावातील लोकांना अशा कोणत्याही मेळाव्यात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी व्हायरल झालेला हा व्हिडिओ सुरगुजा आणि बलरामपूरमध्ये गटामध्ये झालेल्या भांडणाशी जोडला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सुरगुजा आणि बलरामपूर जिल्ह्यातील दोन गावांतील लोकांमध्ये शुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक म्हणत आहेत की, 'आजपासून आम्ही हिंदू (Hindu) शपथ घेत आहोत की आम्ही कोणत्याही मुस्लिम (Muslim) दुकानदाराकडून कोणत्याही प्रकारचा माल खरेदी किंवा विकणार नाही.

Villagers
Viral Video: 'इस थूक में जान है' म्हणत जावेद हबीब महिलेच्या केसांवर थुंकला

'मुस्लिम फेरीवाल्यांवर बहिष्कार घालणार'

व्हिडीओमध्ये लोक आपल्या गावात येणाऱ्या फेरीवाल्यांच्या धर्माची चौकशी करण्यात येईल, असंही म्हणताना दिसत आहेत. आम्ही हिंदू फेरीवाल्यांकडूनच वस्तू खरेदी करणार आहोत. तो फेरीवाला मुस्लिम असेल तर तो माल आम्ही खरेदी करणार नाही, असही ते म्हणत आहेत. दरम्यान या प्रकरणी सुरगुजा जिल्हाधिकारी संजीव झा यांनी सांगितले की, 'एएसपी आणि एसडीएम यांनी गुरुवारी गावाला भेट दिली असून तेथील लोकांशी चर्चा केली आहे. पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी कारवाई सुरु आहे. हा सर्व प्रकार नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये घडला आहे.' काही लोक या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व होऊ देणार नसल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

वादाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न

सुरगुजा एएसपी विवेक शुक्ला (Vivek Shukla) यांनी सांगितले की, 1 जानेवारी रोजी बलरामपूरच्या कुंभकला गावात आरा गावातील काही लोक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आले होते. त्याचवेळी दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. ते पुढे म्हणाले की, आराहमध्ये राहणाऱ्या एका विशिष्ट समाजाच्या लोकांचे कुंभकला गावातील लोकांशी भांडण झाले. पोलिसांनी संबंधित कलमान्वये गावकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी 6 जणांना अटक करण्यात आली. मात्र, तुरुंगात गेल्यानंतर त्यांना तात्काळ जामीन मंजूर करण्यात आला. यामुळे कुंभकला गावातील लोक संतप्त झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बाहेरुन आलेल्या काही लोकांनी संधीचा फायदा घेत गावातील लोकांना भडकावून त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com