Kumbh Mela 2021: शाही स्नानासाठी झालेल्या गर्दीत कोरोना नियमांचे वाजले तीनतेरा

दैनिक गोमंतक
सोमवार, 12 एप्रिल 2021

देशात एकीकडे कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत जात असताना, हरिद्वार मध्ये कुंभमेळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळते आहे.

देशात एकीकडे कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत जात असताना, हरिद्वार मध्ये कुंभमेळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळते आहे. आज कुंभमेळ्यातील दुसरे शाही स्नान पार पडते आहे. पोलिस प्रशासनापासून ते आखाड्यांनी आपली तयारी पूर्ण केली असल्याचे पाहायला मिळते आहे. शाही स्नानाच्या अगोदर गंगेत स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमल्याचे पाहायला मिळाले. यावेळी झालेल्या गर्दीमुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. (Violation of corona rules in the crowd for the Shahi Snan In Kumbh Mela)

स्वदेशी संरक्षण उत्पादनांमध्ये 75 टक्के परदेशी सामग्रीचा वापर

कुंभमेळ्यासाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांकडून वारंवार कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. 'आम्ही सतत लोकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचा आग्रह करत असतो मात्र इथे झालेल्या प्रचंड गर्दीमुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे (Covid Preventuion Rules) पालन होणे अशक्य आहे.', असे कुंभ मेळ्याचे आयजी  संजय गुंजय्या यांनी सांगितले. तसेच याठिकाणी झालेली गर्दी पाहता घाटावरच्या परिसरात सामाजिक अंतर सारख्या नियमांचे पालन करणे अशक्य असून जर त्यासाठी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे आपण तसे प्रयत्न करत नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.  

दरम्यान, सकाळी 7 वाजेपर्यंत घाटावर सर्वसामान्यांना स्नानासाठी परवानगी दिली जाणार असून, त्यानंतर ही जागा आखाड्यांसाठी राखीव ठेवली जाणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. सोमवती अमावस्येच्या मुहूर्तावरील शाहीस्नान (Shahi Snan) करता यावे म्हणून भाविकांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले असल्याचे देखील कुंभमेळा (Kumbh Mela) पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. 
 

संबंधित बातम्या