भारतातील ॲपलची पुरवठादार असलेल्या विस्ट्रॉन कंपनीकडून कामगार नियमांचा भंग

वृत्तसंस्था
रविवार, 20 डिसेंबर 2020

भारतातील ॲपलची पुरवठादार असणाऱ्या विस्ट्रॉन कंपनीच्या कारखान्यात मनुष्यबळ व्यवस्थापन आणि अन्य बाबींमध्ये मोठ्या प्रमाणावर नियमांचा भंग झाल्याची बाब सरकारी चौकशीतून उघड झाली आहे.

बंगळूर : भारतातील ॲपलची पुरवठादार असणाऱ्या विस्ट्रॉन कंपनीच्या कारखान्यात मनुष्यबळ व्यवस्थापन आणि अन्य बाबींमध्ये मोठ्या प्रमाणावर नियमांचा भंग झाल्याची बाब सरकारी चौकशीतून उघड झाली आहे. कंपनी वेळेवर वेतनच देत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता, त्यांनीच पुढे कार्यालयाची मोडतोड करत लुटालूट केली होती. या घटनेनंतर कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते तसेच हा प्रकल्प देखील  बंद करावा लागला होता.

आयफोनची जुळवाजुळव करणाऱ्या या कंपनीमधील कर्मचाऱ्यांची संख्या एका वर्षाच्या काळामध्ये पाच हजारांवरून साडेदहा हजारांवर गेली होती असे कर्नाटक कारखाने विभागाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. साडेदहा हजार कर्मचाऱ्यांना सांभाळताना कंपनीच्या मनुष्यबळ विभागातील कर्मचाऱ्यांना कामगार कायद्यांची पुरेशी माहिती नसल्याचे पाहणी अहवालातून उघड झाले आहे.

कामाचे तास वाढविले

कंपनीने ऑक्टोबर महिन्यामध्ये कामाचे तास वाढविले होते ते आठवरून बारा करण्यात आले होते पण या वाढीव कामाबाबत किती भत्ता देण्यात येईल याबाबतचा कामगारांच्या मनातील संभ्रम मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांना दूर करता आला नाही. 

संबंधित बातम्या