धक्कादायक : भारतात महिलांवरील हिंसाचारात 30 टक्क्यांची वाढ

कर्नाटकात 48 टक्के हिंसाचार झाले; त्यापाठोपाठ बिहार, तेलंगणा, मणिपूर आणि तामिळनाडूचा क्रमांक
Violence women
Violence womenDainik Gomantak

देशात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रमुख्याने दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. मात्र ह्या समस्या कमी न होता त्या वाढतच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे वाढलेले हिंसाचाराची प्रकरणे कर्नाटकात सर्वाधिक वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच राजकिय नेते या मुद्याचा वापर लोकप्रतिनिधी केवळ राजकिय मुद्दा म्हणूनच वापरत असल्याचं ही स्पष्ट झालं आहे. ( Violence against women rises by 30% in India )

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एक धक्कादायक बाब समोर असुन केलेल्या सर्वेक्षण अहवाल-5 (NFHS) नुसार, भारतात महिलांवर होणाऱ्या शाररिक हिंसाचारात 30 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुरुवारी हा अहवाल जाहीर केला. यातील निराशाजनक बाब म्हणजे केवळ 14 टक्के महिलांनीच या हिंसाचाराविरोधात आवाज उठवला आहे.

Violence women
गँगस्टर विकास दुबेची 67 कोटींची मालमत्ता जप्त; योगी सरकारने घेतला निर्णय

हिंसाचारात कर्नाटक राज्य आघाडीवर

महिलांवर हिंसाचार होणऱ्या घटनांमध्ये कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. कर्नाटकात महिलांवर सर्वाधिक म्हणजेच 48 टक्के घरगुती हिंसाचार झाले आहे. त्यापाठोपाठ बिहार, तेलंगणा, मणिपूर आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो.

Violence women
BJP-RSS ने भगवान रामाची प्रतिमा 'रॅम्बो' सारखी बनवली: मुख्यमंत्री भूपेश बघेल

लक्षद्वीपमध्ये महिलांवरील घरगुती हिंसाचार होण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. (2.1 टक्के). महिलांच्या तुलनेत देशातील केवळ ४ टक्के पुरुषांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो आहे. तसेच या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की 30 टक्के विवाहित महिला वयाच्या 18 ते 49 वर्षात लैंगिक किंवा भावनिक हिंसाचाराच्या बळी पडल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com