निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना; पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता

दैनिक गोमंतक
मंगळवार, 4 मे 2021

विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसेच्या घटना घडल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये नुकतेच विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक घटना घडत असल्याचे पाहायला मिळाले आहे. या घटनांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये घडणाऱ्या हिंसेच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली असल्याचे पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी सांगितले आहे. (Violence is on the rise in West Bengal following the Assembly election results.)

केेद्राचा राज्यांना सल्ला; संसर्गग्रस्त भागात 14 दिवसासाठी लॉकडाउन लावा

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काल 2 मे रोजी जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्ष 213 जागांवर विजय मिळाला असून राज्यात सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर भारतीय जनता पक्ष 77 जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. मात्र या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसेच्या घटना घडल्या आहेत.

या परिस्थितीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Nanredra Moi) यांनी चिंता व्यक्त केली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून कायदा आणि सुव्यवस्थे बद्दल चिंता आणि नाराजी व्यक्त केली आहे. तर आपण देखील या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत राज्यात तोडफोड आणि हत्येच्या गंभीर घटना होत असून, राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले" अशी माहिती पश्चिम बंगालचे राज्यपाल (Governer Of West Bengal) जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांनी दिली आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे पोहोचले असल्याचे समजते आहे. जे.पी. नड्डा हे दोन दिवस पश्चिम बंगालमध्ये असणार आहेत. या काळात नड्डा हे हिंसाचाराच्या (Violence)घटना घडलेल्या ठिकाणी तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत.

संबंधित बातम्या