'पश्चिम बंगालमध्ये भाजपला मतं दिली, तर रक्ताचे पाट वाहतील'

वृत्तसंस्था
सोमवार, 21 डिसेंबर 2020

भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असतानाच भाजपला मतदान करणाऱ्यांना धमकी देणारा मजकूर लिहिल्याचे नदीया जिल्ह्यातील एका भिंतीवर आढळून आले आहेत.

कोलकता :  भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असतानाच भाजपला मतदान करणाऱ्यांना धमकी देणारा मजकूर लिहिल्याचे नदीया जिल्ह्यातील एका भिंतीवर आढळून आले आहेत. ``तृणमूल काँग्रेसच्या विरोधात एकही मत दिले गेले तर रक्ताचे पाट वाहतील. भाजपला मत दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, `` अशी धमकी देणारा मजकूर नाडिया जिल्ह्यात एका भिंतीवर लिहिल्याचे आढळून आले. हा मजकूर कोणी लिहिला हे मात्र कळालेले नाही.भाजपचे जगन्नाथ सरकार हे येथील खासदार आहेत, तर तृणमूल काँग्रेसचे अरिंदम भट्टाचार्य हे आमदार आहे.

 

अधिक वाचा :

ममता बॅनर्जींचं सरकार भ्रष्टाचार आणि राजकीय हिंसाचारात क्रमांक एकवर 

भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम आहेत, त्यांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घ्या 

 

संबंधित बातम्या