पुद्दुचेरी कॉंग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत जोरदार हाणामारी

दैनिक गोमन्तक
रविवार, 14 मार्च 2021

पुद्दुचेरी मध्ये कॉंग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत आज जोरदार गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

पुद्दुचेरी मध्ये कॉंग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत आज जोरदार गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पुद्दुचेरीत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीसाठी कॉंग्रेस निवडणूक समितीची आज बैठक झाली. यावेळी कॉंग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीदरम्यान एका पक्षाच्या नेत्याने द्रमुकचा झेंडा फडकावल्याने मोठाच गोंधळ उडाला. या बैठकीत पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री नारायणसामीही उपस्थित होते. आणि नारायणसामी यांच्यासमोरच नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

मराठी लोकांवर बेळगावमध्ये हल्ल्यांबाबत पंतप्रधान,गृहमंत्री गप्प का? - संजय राऊत

राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कॉंग्रेस निवडणूक समितीची बैठक पार पडत होती. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री नारायणसामीही हजर होते. व नेमके याचवेळी पक्षाच्याच एका नेत्याने अन्य पक्षाचा झेंडा फडकावल्याने खळबळ उडाली. यानंतर नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ले करतानाच नंतर ते एकमेकांवर तुटून पडले. कॉंग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत झालेल्या गदारोळानंतर अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी कॉंग्रेस कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आले.

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हांचा तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत द्रमुकने 13 पैकी 12 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बागुर मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा नंतर करणार असल्याचे द्रमुकने म्हटले आहे. या यादीनुसार एस गोपाल हे उरुलियानपेट येथून निवडणूक लढवणार आहेत. यासोबतच उप्पलम मधून अनिपाल केनेडी, मंगलम मधून सूर्य कुमरावेल, मुदलियारपेट मधून एल संपत, विल्लियानूर मधून आर शिव व नेलिथुपु मधून वी कार्तिकेयन निवडणूक लढवणार आहेत. यानंतर, एसपी शिवकुमार हे राजभवन निर्वाचन येथून, मन्नादीपट्टू मधून ए के कुमार, कल्लपट्टूतून एस मुथुवेल, थिरुपुनाईतून ए मुगिलन, कराइकल दक्षिण येथून एएमएच नजीम आणि  नीरवी थिरुपट्टिनम मतदारसंघातून एम नगथियाराजन निवडणूक लढवणार आहेत.      

संबंधित बातम्या