Viral Video: चपलांचा हार घालून महिलेला क्रूर मारहाण, सर्व गाव फक्त पाहत राहिला

व्हिडिओत ती एखादी ग्रामसभा असल्याचे दिसत आहे.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak

Viral Video: सोशल मिडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका महिलेला सर्व गावासमोर गंभीररित्या मारहाण केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुरूवातीला या महिलेला चप्पलांचा हार घालण्यात आला व त्यानंतर तिला मारहाण करण्यात आली आहे. व्हिडिओत ती एखादी ग्रामसभा असल्याचे दिसत आहे.

(A women beaten by person in Gramsabha)

Viral Video
Blast in Afghanistan: काबूलमध्ये बॉम्बस्फोट! लष्करी विमानतळावरील स्फोटात 10 ठार, आठ जखमी

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून, नागरिकांना या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. तालिबानी राजवट भारतात आली आहे का प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Viral Video
Margao: ख्रिसमस दरम्यान दुचाकींवर डल्ला, कोल्हापूर येथील चोरट्याला अटक

व्हायरल होणारा हा व्हिडिओ नक्की कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या व्हिडिओत गावकऱ्यांची एक पंचायत दिसत आहे. वर्तुळ करून बसलेल्या गावकऱ्यांच्या मधोमध एक महिला उभी आहे. एक पुरूष सुरूवातीला तिच्या गळ्यात चप्पलांचा हार घालतो. त्यानंतर एक पुरूष काठ्यांचा एक संच घेऊन महिलेला क्रुरपणे मारहाण करतो. यात महिला शांतपणे काठ्यांचा मार सहण करताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्व गावकरी यावेळी उपस्थित असताना एकही महिलेच्या मदतीला आला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com