Viral Video : अरे देवा! प्रियकर लग्नमंडपात आला आणि वधूला घेऊन गेला; अन्...पुढे काय झालं एकदा बघाच

हा व्हिडीओ एका लग्न समारंभाचा आहे ज्यात एक माणूस, वृद्ध वराला दुसऱ्याशी बोलण्यात गुंतलेला पाहून मंचावर जातो आणि वधूला घेऊन पळून जातो.
Viral Video lover came and took the bride away
Viral Video lover came and took the bride away Dainik Gomantak

वधूच्या संमतीशिवाय कोणतेही लग्न झाले की त्यात काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नेहमीच असते. अनेक वेळा वधूने लग्नातून पळून जाऊ नये अशी शंकाही घरच्यांना असते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक प्रियकर स्टेजवर येतो, वधूच्या भांगेत कुंकू भरतो आणि नंतर तिला सोबत घेऊन पळून जातो. या घटनेचे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आता जाणून घेऊया. हा व्हिडीओ एका लग्न समारंभाचा आहे ज्यात एक माणूस, वृद्ध वराला दुसऱ्याशी बोलण्यात गुंतलेला पाहून मंचावर जातो आणि वधूला घेऊन पळून जातो.

(Viral Video lover came and took the bride away )

Viral Video lover came and took the bride away
Goa App Taxi Issue : गोव्यात टॅक्सीवाल्यांची मुजोरी कधी थांबणार?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लग्नाचा सोहळा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मंचावर वधू-वर बसले आहेत. यामध्ये वराचे वय खूप जास्त आहे, तर वधूचे वय कमी आहे. वधू टेकून शांत बसली आहे. त्याच वेळी, वर त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या अनेक महिलांशी बोलण्यात व्यस्त आहे. यादरम्यान अशी काही घटना घडते ज्याने तुम्हालाही हसू येईल.

खरं तर, जेव्हा वर दुसऱ्या स्त्रीशी बोलण्यात व्यस्त असतो, तेव्हा स्टेजच्या मागून एक पुरुष वधूच्या दिशेने चालत येतो. जो वधूचा प्रियकर असल्याचे दिसते. त्या व्यक्तीने हातात कुंकू घेतले आहे. तो वधूच्या खुर्चीच्या मागे उभा राहतो आणि मागून तिच्या भांगेत कुंकू भरतो.

व्हिडिओ पाहून लोक झाले अवाक

धक्कादायक बाब म्हणजे यादरम्यान वराला हे सर्व घडताना दिसत नाही. व्हिडीओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की वधूला सिंदूर लावल्यानंतर तो पुरुष तिचा हात धरून तिला चालण्याचा इशारा करतो.

नववधूनेही त्या व्यक्तीला ओळखले आहे असे दिसते, तीही उठते आणि दोघेही स्टेजच्या मागून शांतपणे फरार होतात. हा व्हिडिओ पाहण्यास खूपच मजेशीर आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर shitty.humours नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com