''ज्या हिंदूंना धमक्या येतात, त्यांना शस्त्र परवान्यासाठी मदत करु''

'विश्व हिंदू परिषद' हिंदूंना मदतीसाठी करणार हेल्पलाईन सुरू
Vishva Hindu Parishad
Vishva Hindu ParishadDainik Gomantak

काही दिवसांपूर्वी भाजप निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याने देशभरात तसेच देशाबाहेर पडसाद उमटले होते. या घटनेनंतर गुजरात तसेच हरियाणा येथे हिंदू नागरिकांना धमक्या येत असल्याच्या घटना घडत आहेत. यासाठी विश्व हिंदू परिषदेने मदत म्हणून हेल्पलाईन सुरु करणार असल्याचं म्हटले आहे. या बाबतचा ठराव हरियाणातील गुरगाव येथे आयोजित विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीत करण्यात आला. ( Vishva Hindu Parishad releases helpline for Hindu community will help to procure arms Licence )

मिळालेल्या माहितीनुसार विश्व हिंदू परिषदेने असे म्हटले आहे की, “स्वसंरक्षणाचा अधिकार सर्वांनाच बहाल करण्यात आलेला आहे. सध्याचे वातावरण पाहता. एखाद्या व्यक्तीला स्वसंरक्षणार्थ शस्त्र हवे असेल तर त्यात चुकीचे काय आहे ? आमचा त्याला पाठिंबा आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून हिंदूंना शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल.

Vishva Hindu Parishad
डीके मित्तल यांच्या घरी आयकर विभागाचा छापे, 2 कोटींहून अधिक रक्कम जप्त

कोणाला धमकी मिळत असेल आणि त्याला संरक्षणासाठी शस्त्र हवे असेल तर आम्ही मदत करू. प्रशासनाशी बोलून आम्ही त्यांना परवाना मिळवून देऊ. कायद्याचा चौकटीत राहूनच ही सर्व प्रक्रिया केली जाईल,” असे हरियाणा विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष पवन कुमार यांनी सांगितले.

Vishva Hindu Parishad
जामतारा पुन्हा चर्चेत, 'सरकारी शाळांना शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी'

“देशविरोधी शक्तींना देश कमकुवत करायचा आहे. हिंदूंना मारले जात आहे. नुपूर शर्मा यांना धमकावले जात आहे. हिंदू देव-देवतांचा अपमान करणारे पोस्टर्स शेअर केले जात आहेत. याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. याच कारणामुळे आम्ही शांत न बसण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या जिहादीने हिंदूंना धमकी दिली, तर मदतीसाठी आम्ही हेल्पलाईन जारी केली आहे. या नंबरवर कॉल करातच हिंदूंना मदत केली जाईल.

तसेच पोलिसात गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई केली जाईल. समाजमाध्यमांवर कोणी आक्षेपार्ह पोस्ट लिहिली तरीही आम्ही कायदेशीर कारवाई करु. हे करताना आम्ही कायदा हातात घेणार नाही,” असे देखील पवन कुमार यांनी सांगितले. त्यामूळे स्वसंरक्षणाच्या हेतूने आम्ही हिंदू बांधवाच्या सुरक्षेसाठी हा मार्ग अवलंबत असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com