यंदा खरेदीला जाताना..'व्होकल फॉर लोकल’!

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात खरेदी करताना नागरिकांनी स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यावी, असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवी दिल्ली:  सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात खरेदी करताना नागरिकांनी स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यावी, असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आपल्या ७० व्या ‘मन की बात’मधून देशवासीयांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना त्यांनी कोरोना पार्श्‍वभूमीवर सण साजरा करताना संयम पाळण्याची सूचनाही नागरिकांना केली. 

मोदी म्हणाले, सण-उत्सवांमधील उत्साहावरच बाजारातील तेजी अवलंबून असते. त्यामुळे यंदा खरेदीला जाताना ‘व्होकल फॉर लोकल’ हा आपला संकल्प नेहमी लक्षात ठेवा. देशात अनेक ठिकाणी जागतिक दर्जाचे उत्पादन होते; तर अनेक उत्पादनांत वैश्‍विक होण्याची क्षमता आहे. त्यापैकीच एक उत्पादन म्हणजे खादी. कोरोनाच्या संकटकाळात मास्क ही जीवनावश्‍यक  वस्तू बनली.

देशभरात अनेक स्वंयसहायता समूह, महिला बचत गट खादीचे मास्क बनवत आहेत. नागरिकही त्यांच्या खरेदीला आता प्राधान्य देत आहेत. दिल्लीतील एका खादी दुकानातून गांधी जयंतीच्या दिवशी एक कोटीहून अधिक खरेदी झाल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील सुमन देवी यांचे उदाहरण देताना सांगितले की, त्यांनी कोरोनासंकटाला एक संधी म्हणून बघत आपल्या आसपासच्या महिलांसह खादीचे मास्क बनविण्यास सुरुवात केली. हळूहळू अनेक महिला त्यांच्या सोबतीला आल्या. आता त्या सर्व मिळून हजारो खादीचे मास्क तयार करत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही खरेदीमध्ये अशा उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मोदींनी के

संबंधित बातम्या