मोबाईलवरील बोलणे महागणार?

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

वोडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ कंपन्यांनी आपल्या दरात वाढ करण्याचा विचार सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी काही दिवसांत मोबाईलवरील बोलणे महागण्याची शक्‍यता आहे.

नवी दिल्ली: वोडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ कंपन्यांनी आपल्या दरात वाढ करण्याचा विचार सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी काही दिवसांत मोबाईलवरील बोलणे महागण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे, दोन्ही कंपन्यांचे लक्ष त्यांचे प्रमुख स्पर्धक असलेल्या जिओच्या दरवाढीबाबतच्या निर्णयाकडे लागले आहे.

वोडाफोन आपल्या दरात १५ ते २० टक्‍क्‍यांनी वाढ करण्याचा विचार करीत आहे. वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून ती अंमलात येण्याची शक्‍यता आहे. वोडाफोन-आयडियाच्या अपेक्षित निर्णयाने त्यांचा समभागही वधारला आहे. भारती एअरटेलही आपल्या दरात वाढ करण्याची शक्‍यता आहे. अर्थात दोन्ही कंपन्या आपला प्रमुख स्पर्धक जिओ काय निर्णय घेणार, याकडे लक्ष ठेवून आहेत. जिओच्या नव्या दरानुसार वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल त्याबाबत निर्णय घेतील, असे काही अभ्यासकांचे मत आहे.  

संबंधित बातम्या