चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदानाला सुरुवात

दैनिक गोमंतक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी येथे आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच जवळपास सर्वच ठिकाणी लोकांनी मतदानासाठी रांगा लावलेल्या दिसत आहेत.

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी येथे आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच जवळपास सर्वच ठिकाणी लोकांनी मतदानासाठी रांगा लावलेल्या दिसत आहेत. तामिळनाडूमधील 234, केरळमधील  140 आणि पुदूचेरीच्या 30 जागांसाठी आज मतदान होत आहे, तर आसाममध्ये तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यात 40 जागांवर मतदान होणार आहे. या चार राज्यात निवडणुका पूर्ण होणार असुन, पश्चिम बंगालमध्ये मतदानाचे अजून पाच बाकी राहणार आहेत. (Voting begins today in four states and one union territory)

पश्चिम बंगालमध्ये आज 31 जागांवर मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. देशभराचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा हा टप्पा खूप महत्वपूर्ण असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आज चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 475 जागांवर मतदान पार पडणार आहे. तामिळनाडूमध्ये 6.28 कोटींपेक्षा जास्त मतदार आहेत तर 3998 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. आसाम विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान सुरू आहे. ज्याठिकाणी मंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांच्यासह 337 उमेदवारांचे या निवडणुकीत भवितव्य ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये 78.5 लाखाहून अधिक नोंदणीकृत मतदार आहेत, तर 205 उमेदवार निवडणूक लढवता आहेत. तर  केरळमध्ये 27 लाख मतदार असून,  निवडणुकीच्या रिंगणात 140 उमेदवार उतरलेले आहेत. 

Assembly Election 2021: पंतप्रधान मोदींनी या चार भाषांमध्ये केलं मतदारांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आसाम, केरळ, पुदुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये आज होत असलेल्या  विधानसभा निवडणुकीत विशेषत: तरुण मतदारांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. 

काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील ट्विट करून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

संबंधित बातम्या