बिहार विधानसभा निवडणूक: पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

कोरोना महामारीच्‍या कालावधीत होणारी देशातील ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे मतदानाच्यावेळी खबरदारी घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असून त्यासंदर्भात नियमावलीही जाहीर केली आहे.

पाटणा-  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ७१ मतदारसंघात आज मतदान होणार आहे. दोन कोटींपेक्षा जास्त मतदार एक हजार ६६ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. 

कोरोना महामारीच्‍या कालावधीत होणारी देशातील ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे मतदानाच्यावेळी खबरदारी घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असून त्यासंदर्भात नियमावलीही जाहीर केली आहे. यात एका मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होऊ नये म्हणून ती संख्या एक हजार ६०० वरून एक हजारपर्यंत मर्यादित ठेवली आहे. मतदानाची वेळ ठरविणे, ८० वर्षांवरील किंवा ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, अशा मतदारांसाठी टपालाने मतदानाची सुविधा अशी तयार करण्यात आली आहे. 

मतदानाच्या तयारीत...

एकूण मतदार-  २.१४ कोटी

महिला - १.०१कोटी 

पुरूष- १.१३ कोटी 

तृतीयपंथी- ५९९ 

संबंधित बातम्या