Nirmala Sitharaman: डेटॉलने तोंड साफ करा... अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काँग्रेसवर बोचरी टीका

लोकसभेत 2023-24 च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेदरम्यान काँग्रेसला टोला लगावला.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanLoksabha

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी विरोधी पक्ष काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली.

लोकसभेत 2023-24 च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेदरम्यान काँग्रेसला टोला लगावला. 'भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी डेटॉलने तोंड धुवून या. भ्रष्टाचारावर कोण बोलत आहेत?' अशा शब्दात अर्थमंत्री म्हणाल्या.

Nirmala Sitharaman
Solar Polar Vortex Video: काय सांगता! सूर्याचा मोठा भाग तुटला? शास्त्रज्ञही झाले आश्चर्यचकित

व्हॅटच्या मुद्द्यावरून अर्थमंत्र्यांनी काँग्रेसलाही धारेवर धरले. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशमध्ये सरकार बनल्यानंतर लगेचच काँग्रेसने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट वाढवला आहे. काँग्रेसवर ताशेरे ओढत अर्थमंत्री म्हणाल्या की, काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशने गेल्या वर्षी सत्तेत आल्यानंतर डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढवला होता. तुम्ही हिमाचल प्रदेशात डिझेलवर व्हॅट वाढवला. ही काँग्रेसची संस्कृती आहे. ते आरोप करतील, सभागृहाबाहेर जातील, पण ऐकणार नाहीत.

Nirmala Sitharaman
Anjuna Beach: गोव्यात खोटे गुन्हे दाखल होताहेत, सतर्क राहा... कोणी आणि का दिलाय हा इशारा!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंजाबमधील पेट्रोल डिझेलवरील व्हॅटबद्दलही बोलल्या. पंजाब सरकारने फेब्रुवारीमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्येही वाढ केली आहे. त्यानंतर त्याची किंमत 95 रुपये प्रति लीटर झाली आहे. असे त्या म्हणाल्या.

दुसरीकडे, भाजपच्या एका खासदाराने अर्थमंत्र्यांना राजस्थानवर बोलण्यास विचारले असता ते म्हणाले की, राजस्थानमध्ये गोंधळ आहे, भाऊ, गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प यंदा वाचला आहे. चुका कोणाकडूनही होऊ शकतात, पण मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प वाचावा लागेल अशी परिस्थिती कोणाच्याही समोर येऊ नये, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com