Viral Video: शॉकिंग! हा व्यक्ती सिंहासह खेळतोय बिनधास्त फुटबॉल

Lion And Lioness Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक माणूस सिंहांमध्ये मस्तीच्या मूडमध्ये फुटबॉल खेळताना दिसत आहे.
Lion And Lioness Video
Lion And Lioness VideoDainik Gomantak

आपल्याला जंगली आणि हिंसक प्राण्यांचा विचार केल्याने सुध्दा भीती वाटते. ते जर समोर आले तर काय होईल याची कल्पना करा. नुकताच असा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ते पाहून लोक शॉक झाले आहे. जंगलाचा राजा सिंह आणि जंगलातील इतर प्राण्यांसमोरही जाणे माणसे टाळतात. पण एका व्यक्तीचा व्हायरल झालेला व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सूट-बूट घातलेला एक माणूस सिंहांसह फुटबॉल खेळत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.

व्हायरल होत असलेल्या या शॉकिंग व्हिडिओमध्ये, सूट-बूट घातलेला माणुस सिंहासह मस्त फुटबॉल खेळतांना दिसत आहे. कोणत्याही संरक्षणाशिवाय सिंहांपर्यंत पोहोचल्यानंतर तो माणूस आनंदाने फुटबॉल (Football) खेळू लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये सिंह एकमेकांकडून फुटबॉल हिसकावून खेळताना दिसत आहेत. सहसा सिंह आपल्या जवळ येणार्‍या कोणत्याही व्यक्तीला किंवा प्राण्याला शिकार मानतात, परंतु या व्हिडिओतील (Video) दृश्य वेगळे आहे.

Lion And Lioness Video
Sketch Artist: तुम्ही हा चमत्कार एकदा पाहाच! या मुलीने केला खास रेकॉर्ड, Video

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'feline.unity' नावाने शेअर करण्यात आला आहे. ज्यामुळे यूजर्स हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ खरोखर कोणालाही आश्चर्यचकित करू शकतो. आतापर्यंत 67 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या विचित्र प्रतिक्रिया देत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com