जल शक्ती मंत्र्यांचे अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

Pib
सोमवार, 29 जून 2020

सरकारच्या विविध ग्रामीण रोजगार योजनांच्या माध्यमातून हे अभियान राबवले जावे, असे केंद्रीय मंत्र्यांनी अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

नवी दिल्ली, 

केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जल जीवन अभियानाची राज्यात जलद अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पथदर्शी योजना असून, या अंतर्गत, वर्ष 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. या विकेंद्रित, मागणी- आधारित समुदाय-व्यवस्थापन आधारित योजनेमुळे भारतात, पेयजल योजनेच्या क्षेत्रात मोठी क्रांती येणार आहे. राज्यांसोबत, भागीदारी करुन जलशक्ती मंत्रालय हे अभियान राबवत आहे. याअंतर्गत, 55 लिटर पाणी दरडोई, दिले जाणार आहेत, या योजनेमुळे, ग्रामीण जनतेच्या जनजीवनात मोठा बदल होणार आहे. 

मार्च 2023,पर्यंत अरुणाचल प्रदेशातील सर्व घरांमध्ये नळाने पाणीपुरवठा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारने यासाठी अरुणाचल प्रदेश सरकारला वर्ष 2020-21साठी 255 कोटी रुपये निधी दिला आहे. एकूण 2.18 लाख ग्रामीण घरांपैकी 37,000 घरांना नळाने पाणीपुरवठा केला गेला आहे. यात उर्वरित जिल्ह्यांना पाणीपुरवठा करतांना, आकांक्षी जिल्ह्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी, अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना या योजनेला गती देण्याची विनंती केली आहे. मिशन मोडवर ही योजना राबवावी अशी विनंती त्यांनी केली आहे. गावागावांपर्यंत ही योजना पोहचवण्याला अधिक प्राधान्य द्यावे, असेही शेखावत यांनी म्हटले आहे. यामुळे, कोविडच्या काळात, सामाजिक अंतर पाळले जाईल तसेच, ग्रामीण जनतेला रोजगार मिळेल तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सुदृढ होईल. असेही, त्यांनी म्हटले आहे.

 

संबंधित बातम्या