Kerala: आफ्रिकन स्वाइन फिव्हरचा प्रसार रोखण्यासाठी Pigs ना मारण्याची मोहीम सुरु

African Swine Fever: जिल्ह्यात अलीकडेच आफ्रिकन स्वाइन फिव्हरचे काही रुग्ण आढळून आले आहेत.
Pigs
PigsDainik Gomantak

African Swine Fever: केरळमधील वायनाड जिल्ह्यात रविवारी आफ्रिकन स्वाइन फिव्हरचा प्रसार रोखण्यासाठी डुकरांना मारण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. जिल्ह्यात अलीकडेच आफ्रिकन स्वाइन फिव्हरचे काही रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, मनंतवाडीच्या उपजिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की, 'भोपाळ येथील राष्ट्रीय सुरक्षा प्राणी संशोधन संस्थेकडून अहवाल प्राप्त झाला आहे. शेतकर्‍यांनी डुकरांना मारण्याच्या मोहीमेत सहकार्य करावे.'

Pigs
Kerala: 'संविधानविरोधी' वक्तव्य केल्याप्रकरणी मंत्र्याने दिला राजीनामा

नुकसान भरपाई दिली जाणार

मनंतवाडी येथील एका शेतातून या आजाराचे दोन रुग्ण आढळून आले. त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ (Bhopal) येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. उपजिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की, 'एका बाधित शेतकर्‍यांकडे 360 डुकरे होती. त्याला सांगण्यात आले आहे की, या रोगाचा रोखण्यासाठी राष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार डुकरांची कत्तल केली जात आहे. या मोहीमेत सहकार्य करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. बाधित शेतकऱ्यांना (Farmers) तात्काळ भरपाई दिली जाईल.' अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, 'वायनाड जिल्ह्यातील मनंतवाडी भागातील दोन फार्ममध्ये डुकरांना आफ्रिकन स्वाइन फिव्हरची लागण झाली होती. त्यानंतर एका शेतातील सर्व जनावरे या तापाने मरण पावली.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com