आम्ही कल्याणकारी योजनांसाठी पैसा वाचवतोय; केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा खुलासा

PRADHAN.jpg
PRADHAN.jpg

देशात कोरोनाचा प्रादूर्भाव (Covid19) वाढत असताना दुसरीकडे मात्र इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे नागरिकांना (citizens) अनेक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. तरी देखील पेट्रोल-डिझेल (Petrol-diesel) कंपन्यांकडून दरवाढ मात्र सुरुच असल्याने सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून  मोदी सरकारवर (Modi government) जोरदार हल्लाबोल केला जात आहे. कॉंग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी इंधन दर वाढीवरुन एक वेगळाच खुलासा केला आहे. (We are saving money for welfare schemes Union Minister Dharmendra Pradhans revelation)

या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, ''कॉंग्रेस नेते राहुल गांधी या आधी उत्तर द्यावे, त्यांचा पक्ष सत्तेत असलेल्या महाराष्ट्रात (Maharashtra) इंधन दरामध्ये एवढी मोठी वाढ का आहे? पंजाब (Punjab), राजस्थानमध्ये (Rajasthan) इंधन दर वाढ झालेली आहे? अशा प्रकारची बेजाबदार वक्तव्य केवळ राहुल गांधीचं करु शकतात. मी मान्य करतो की, आताच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना अनेकत अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये कोणतेही दुमत नाही. मात्र केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार सुमारे 35 कोटींपेक्षा अधिक वर्षभराच्या आत कोरोना लसीकरणावर (Vaccination) खर्च होत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लाख कोटी रुपये खर्च करुन मोफत धान्य देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरु केली. पीएम किसान योजनेच्या अंतर्गत हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर थेट पोहोचवले आहेत. मी याच वर्षाबाबत बोलत आहे.''

तसेच, आता देशातील शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेत, तादूंळ आणि गव्हाच्या एमएसपीची घोषणा केली होती. हे सर्व खर्च आता आणि त्याशिवाय देशात विकासकामं होण्यासाठी गुंतवणुकीची आवशयकता भासत आहे. या कोरोनाच्या कठीण काळामध्ये आम्ही पैसे वाचवून लोक कल्याणाच्या कामात लावले आहे. जर कॉंग्रेस नेते राहुल गांधींना गोरगरिबांद्दल एवढीच चिंता असेल त्यांना आपले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना आदेश द्यावा. आज महाराष्ट्रात पेट्रोलवर सर्वात जास्त कर आहे. असंही प्रधान यांनी बोलून दाखवले. 

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी, पेट्रोल-डिझेलचे दर अद्याप कमी करता येणार नाही असं याआगोदर स्पष्ट केले होते. केंद्र सरकारचे उत्पन्न बरेच कमी झाले आहे. त्यामुळे इंधन दरात आता घट करता येणार नाही'' असं प्रधान यांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com