रेमडिसीवीर  कोरोनासाठी गुणकारी असल्याच्या कोणताही पुरावा नाही : जागतिक आरोग्य संघटना 

दैनिक गोमंतक
बुधवार, 21 एप्रिल 2021

देशभरात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या रेमडीसीवीर औषधाचा प्रचंड तुटवडा भासत आहे. कोरोनाबाधित व्यक्तीला रेमडीसीवीर मिळावे यासाठी मेडिकल समोर रांगा लागल्याचे दिसून येत आहे. औषधाअभावी कोरोना बंधितांच्या मृतयुतही वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या रेमडीसीवीर औषधाचा प्रचंड तुटवडा भासत आहे. कोरोनाबाधित व्यक्तीला रेमडीसीवीर मिळावे यासाठी मेडिकल समोर रांगा लागल्याचे दिसून येत आहे. औषधाअभावी कोरोना बंधितांच्या मृतयुतही वाढ झाली आहे. मात्र या  रेमडिसीवीर औषधाबाबत जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. WHOने  रेमडिसीवीरला औषधांच्या यादीतून वगळले असून  रेमडिसीवीर औषध कोरोनासाठी गुणकारी आहे, असा कुठलाही पुरावा नसल्याचेही WHOने नमूद केलं आहे.  WHO चे प्रवक्ते तारिक जसारेविक यांनी याबाबत माहिती दिली आहे. (We have no evidence that remedicavir is effective for corona: World Health Organization) 

किती दिवस राहणार कोरोनाची दुसरी लाट ?  संशोधकांनी दिले उत्तर

''एकाही देशाने कोरोनावर उपचार करण्यासाठी रेमडिसीवीर हे औषध खरेदी करु नये, त्याचबरोबर आम्ही रेमेडिसविर हे औषध प्रीक्वालिफिकेशन लिस्टमधून बाद केलं आहे. तसेच, कोरोनासाठी हे औषध गुणकारी असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे जसारेविक यांनी म्हटलं आहे.  दरम्यान, सध्या  भारतासह,  पन्नास देशांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी देशभरात रेमडिसीवीर औषधाचा वापर केला जात आहे.  मात्र गेल्या काही दिवसांपासून रेमडिसीवीरचा प्रचंड तुटवडा भासत आहे. काही ठिकाणी या औषधाचा काळा बाजारही सुरू आहे.  तर दुसरीकडे कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक राज्यांत परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे, आरोग्य यंत्रणांवरील ताण प्रचंड वाढला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येतही प्रचंड वाढ होत आहे. 

कोरोना लसींची सर्वाधिक नासाडी करणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडू अव्वल; जाणून घ्या

दरम्यान, देशात वाढती मागणी आणि रेमडिसीवीर  औषधांचा तुटवडा भरन काढण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने या अँटीवायरल औषधाची आयात शुल्क, त्याच्या उत्पादनात वापरली जाणारी सामग्री आणि कच्चा माल यासाठी लागणारे आयात शुल्क काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारात या औषधाची उपलब्धता आणि इंजेक्शनची किंमत कमी होईल. भारतात  रेमडिसीवीर  इंजेक्शनचा उपयोग कोरोना-संक्रमित रूग्णांच्या उपचारांमध्ये केला जातो,  हे पाहता देशात या औषधाची मागणी खूप वाढली आहे.  या मागणीचा विचार करता परिस्थिती सुधारेपर्यंत  सरकारने इंजेक्शन आणि एपीआयच्या निर्यातीवर बंदी घातली होती.  मात्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर विविध औषध कंपन्यांनी रेमडिसीवीरच्या किंमतीत घट केली आहे.  कॅडिला हेल्थकेअरने रिमडॅक (रेमाडॅसीव्हिर 100mg) इंजेक्शनची किंमत 2,800 रुपयांवरून 899 रुपयांवर आणली आहे. त्याचप्रमाणे सिंजेन इंटरनॅशनलने आपल्या ब्रॅण्डच्या रिमविनची किंमत 3,950 रुपयांवरून 2,450 रुपयांवर आणली असल्याची माहिती, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइस ऑथॉरिटीने (एनपीपीए) दिली आहे. 

कोरोना जनजागृती करण्यासाठी छत्तीसगड सरकारची आगळीवेगळी लसीकरण मोहीम     
 
दारम्यान, महसूल विभागाने एका अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, सर्वसामान्यांच्या हितासाठी असे पाऊल उचलणे आवश्यक आहे. त्यामुळे आता  जेव्हा रेमेडिसिव्हिरच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी सामग्री भारतात पोहोचेल तेव्हा  त्या समग्रीवर आयात शुल्क आकारले जाणार नाही. ज्या सामग्रीवर शुल्क काढून टाकले जाते त्यामध्ये रेमडिसीवीर अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल घटक (एपीआय), इंजेक्शन रेमाडेसीव्हिर आणि बीमा सायक्लोडेक्स्ट्रीन हे रेमाडेसिव्हिरच्या निर्मितीमध्ये वापरले जातात. यावरील आयात शुल्क माफी या वर्षाच्या 31 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

संबंधित बातम्या