''जोपर्यंत काळे कायदे रद्द होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांसोबत आंदोलन करु''

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 7 मार्च 2021

100 दिवसंच काय तर 100 महिने जरी लागले तरी शेतकऱ्यांसोबत उभी राहील,असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलेलं आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या 100 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकला नाही. शेतकऱ्यांचे अंदोलन सुरुच आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधीही आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘’आशा कोणत्याही स्थीतीत गमावू नका, 100 दिवस झाले आहेत. 100 आठवडे किंवा 100 महिने जरी लागले तरी जोपर्यंत केंद्र सरकार हे काळे काळे कायदे रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा तुमच्या साथीने सुरुच ठेवणार आहोत,’’ असं कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या.

West Bengal Assembly election 2021: पश्चिम बंगालच्या वाघीणीला शिवसेनेचा पाठींबा

या आधीही कृषी कायद्यावर भाष्य करताना प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. देशातील शेतकरी गेली 100 दिवस केंद्र सरकारच्या विरोधात संघर्ष करत आहेत. 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. शेतकऱ्यांसोबत चर्चा करणं हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र केंद्र सरकारने शेतकऱ्य़ांच्या बलिदानाची फक्त थट्टा चालवली आहे. मी वचन देते की, 100 दिवसंच काय तर 100 महिने जरी लागले तरी शेतकऱ्यांसोबत उभी राहील. असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलेलंआहे.

 

संबंधित बातम्या