''आम्ही असा बंगाल निर्माण करु जो रोजगार आणि स्वरोजगाराने युक्त असणार''

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

बंगालमधील गरजू लोकांना आयुष्यमान योजनेअंतर्गत मिळणारे पाच लाखापर्यंतचे उपचार मिळू शकलेले नाहीत.

हुबळी : आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. तत्पूर्वी बंगालमधील राजकिय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात आरोप- प्रत्य़ारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच बंगालमध्ये या दोन्ही पक्षांच्या प्रतिष्ठा  पणाला लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही राजकिय पक्षांनी सभा घेण्याचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हुबळीमध्ये सभा घेत ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

मोदी म्हणाले, ''तुमचा उत्साह आणि उर्जा दिल्लीपासून ते कोलकातापर्यंत एक मोठा संदेश देत आहे. बंगालने राज्यातील परिवर्तनासाठी मन बनवलेलं आहे. तसेच राज्यात कमळ राजकिय परिवर्तन आणणार असल्याचेही त्यांनी य़ावेळी बोलून दाखवले.

राहुल गांधींनी चालवला ट्रॅक्टर; मनरेगावरून सरकारला सुनावले

मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले की, ''बंगालमधील गरजू लोकांना आयुष्यमान योजनेअंतर्गत मिळणारे पाच लाखापर्यंतचे उपचार मिळू शकलेले नाहीत. बंगालमधील जनता आणि विकास यांच्यात तृणमूल कॉंग्रेसने निर्माण केलेला अडथळ्यांचा हा प्रकार आहे. आम्ही असा बंगाल निर्माण करु जो रोजगार आणि स्वंरोजगाराने युक्त असणार. जिथे राज्यातील सगळ्या जनतेचा विकास असेल. मॉं, माटी, आणि माणूसच्या गप्पा मारणारे लोक बंगालच्या विकासात भिंत म्हणून उभे आहेत. बंगालमध्ये यासाठी राजकिय़ परिवर्तन करण्य़ाची गरज आहे. ज्याच्या आशेवर राज्यातील तरुण जगत आहेत.''

पुदुचेरीमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का

''यावर्षी रेल्वे आणि मेट्रो कनेक्टीवीटी हे केंद्र सरकारची प्राथमिकता आहे.आपल्याला ही कामे या दशकापूर्वीच करायची आहेत. जास्त वेळ लावून चालणार नाही. रेल्वेलाइन्सच्या विस्ताराबरोबर अनेक पायाभूत सुविधांची कामे केली जात आहेत. आणि यासाठी मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे,'' अशी माहिती देखील मोदींनी यावेळी सभेत दिली.

 

संबंधित बातम्या