"काहीही झालं तरी सीएए लागू होऊ देणार नाही"; राहुल गांधींचा घणाघात

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

येत्या काही महिन्यांत आसाममध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरुवात केली आहे.

गुवाहाटी : येत्या काही महिन्यांत आसाममध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरुवात केली आहे. शिवसागर येथून निवडणूक प्रचाराची सुरूवात करताना, बेकायदेशीर स्थलांतर करणे हा आसाममधील एक महत्तवाचा मुद्दा आहे. परंतु, हा हा प्रश्न सोडवण्याची क्षमता आसाममधील लोकांमध्ये आहे असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी म्हणाले, "आसाममधील लोक भाराताच्या पुष्पगुच्छाची फुले आहेत. जर आसामच्या लोकांना त्रास सहन करावा लागला, तर देशाला त्रास होईल."

पुलवामासारख्या हल्ल्याचा कट सुरक्षा दलाने उधळला; जम्मू बसस्थानकातून 7 किलो स्फोटके जप्त

शिवसागर जिल्ह्यातील शिवनगर बोर्डींग मैदानावरुन राहुल गांधींनी निवडणूक प्रचारादरम्यान आसामचे माजी मुख्यमंत्री व दिवंगत नेते तरुण गोगोई यांचं कौतुक केलं. भाजपवर हल्ला चढवत राहुल गांधी म्हणाले, "काहीही झाले तरी सीएए कधीही लागू होणार नाही.जे लोक आसाममध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करतील त्यांना इथली जनता आणि कॉंग्रेस धडा शिकवतील असे राहुल गांधी म्हणाले.  कॉंग्रेस हा नेहमीच लहान व्यापारी आणि दुर्बल लोकांचा पक्ष राहीला आहे."

ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणातील पहिली अटक; बंगळुरूची पर्यावरण कार्यकर्ता दिशाला अटक

"जेव्हा आमचा पक्ष सत्तेत येईल, तेव्हा आम्ही सर्व धर्म आणि जातींच्या लोकांचे संरक्षण करू.2004 से 2014  पर्यंत भारतात वेगाने आर्थिक वाढ झाली. त्यावेळी आमच्या सरकारने कोट्यवधी लोकांना दारिद्र्यरेषेमधून बाहेर काढले होते. आम्ही आसाममधील बेरोजगारी संपवू. आता आसामच्या रिमोट सरकारपासून मुक्त होण्याची वेळ आली आहे. रिमोटने दुरदर्शन चालू शकते,पण आसाम नाही. आपला मुख्यमंत्री हा आसामचाच असला पाहिजे", असं राहुल गांधी म्हणाले

संबंधित बातम्या