कोरोना काळातही भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून भारतातील प्रमुख १०० अब्जाधीशांच्या दौलतीत 12 लाख 97 हजार 822 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीने जगभरातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली. हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार हिरावला गेला. यामुळे भारतासह बहुतेक सर्व देशांमध्ये उत्पन्नातील असमानता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याचा परिणाम शिक्षण, आरोग्य आणि चांगले आयुष्य जगण्याच्या अधिकारांवर गदा आली. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून भारतातील प्रमुख १०० अब्जाधीशांच्या दौलतीत 12 लाख 97 हजार 822 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ही रक्‍कम एवढी आहे की, यातून देशातील 13.8 कोटी गरीब जनतेला प्रत्येकी 94 हजार 45 रुपयांचा धनादेश मिळू शकेल. कोरोनाकाळात भारतातील आर्थिक विषमतेकडे लक्ष वेधणारी ही आकडेवारी विना - नफा संस्था असलेल्या ‘ऑक्सफाम’ने एका अहवालाद्वारे सोमवारी जाहीर केली.

Delhi Tractor Parade: कायदा व सुव्यवस्थेसाठी दिल्लीतील काही भागात इंटरनेट सेवा...

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित केलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत ‘द इनइक्वॉलिटी व्हायरस’ या शीर्षकाचा हा अहवाल मांडण्यात आला. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक च्या आहवालानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे '(आरआयएल) अध्यक्ष मुकेश अंबानी जगातील अव्वल 10 श्रीमंत लोकांमध्ये स्थान मिळवणारे एकमेव आशियाई उद्योजक बनले. भारत मंदीच्या दिशेने जात असताना, ही विडंबना आहे की ‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही थोड्याच अब्जाधीशांची संपत्ती कमी झाली’,असे फोर्ब्सने आपल्या अहवालात म्हटले आहे. हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे की भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकसंख्येचा राष्ट्रीय संपत्तीतील वाटा हा 42.5% आहे तर सर्वसामान्य व गरीब 50% लोकसंख्येचा वाटा फक्त 2.8% आहे, असे ऑक्सफॅमच्या अहवालात म्हटले आहे .

संयुक्त किसान मोर्चाकडून ट्रॅक्टर परेड रद्द; तर आंदोलन शांततेत सुरूच राहणार  

श्री. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आर्थिक अभ्यास व नियोजन केंद्राच्या अध्यक्ष जयती घोष यांनी सांगितले की अंबानी यांच्या कंपन्याची (विशेषत: टेलिकॉम कंपनी जिओ) प्रगती झाली आहे आणि त्यांची वैयक्तिक संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील किमान नऊ अब्जाधीशांनी कोरोना लढण्यासाठी आर्थिक देणगी, उत्पादित वस्तू आणि उपकरणे किंवा इतर रुपात 541 दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली. अमेरिका आणि चीननंतर ही जगातील सर्वाधिक देणगी आहे .पर्यावरण, सामाजिक आणि कॉर्पोरेट कारभाराची माहिती असलेल्या अब्जाधीशांच्या यादीत विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी देखील अव्वल स्थानी आहेत.

 

संबंधित बातम्या