Weather Update: उद्या राजस्थानसह अनेक राज्यात पावसाची शक्यता

पुढील दोन दिवसात उत्तर भारतसह इतर राज्यांमध्ये मान्सून सक्रियतेची शक्यता
Weather Update: उद्या राजस्थानसह अनेक राज्यात पावसाची शक्यता
Rain Dainik Gomantak

गेले काही दिवस शेतकरी वर्ग खरीप हंगामाच्या पेरणीमूळे पावसाची आतूरतेने वाट पाहतो आहे. मात्र पावसाने निराश केल्याचं चित्र अनेक ठिकाणी आहे. असं असले तरी येत्या काही दिवसात मान्सुन सक्रिय होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामूळे शेतकरी वर्गासाठी हा पाऊस अनुकूल ठरणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिल्लीत रिमझिम पाऊस, एनसीआरसह उत्तर भारतात हवामान अल्हाददायक होते. तर दुसरीकडे, ईशान्य, मध्य आणि उत्तर भारतात गेल्या 24 तासांत चांगला पाऊस झाला. (weather update chance of rain in many states of the country )

Rain
स्पाईसजेट विमानाची पाटणामध्ये इमर्जन्सी लँडिंग; 192 जण थोडक्यात बचावले

दुसरीकडे तमिळनाडू आणि केरळसह दक्षिण अंतर्गत कर्नाटकातही मुसळधार पावसाची नोंद झाली. या पावसातून पहिल्या 15 दिवसांतील मान्सूनची तूट भरून काढणे अपेक्षित आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस उत्तर भारतात चांगला पावसाची शक्यता आहे. तसेच आणखी राज्यांमध्ये मान्सून सक्रिय होईल. आणि हा मान्सून शेतकऱ्यांसाठी चांगला ठरू शकतो. असे असताना चेरापुंजीने मात्र आणखी एक विक्रम केला असुन एका दिवसात 971 मिमीपेक्षा जास्त पाऊस लागला आहे.

राजस्थानातील बिकानेर, जयपूर आणि भरतपूर विभागात गेल्या 24 तासांत मान्सूनपूर्व पावसाची मध्यम ते उच्च पातळीची नोंद झाली. या राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले. किमान तापमानातही घट झाली आहे. जयपूर हवामान केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या काळात पूर्व राजस्थानमधील दौसा येथे 85 मिमी पाऊस पडला, तर पश्चिम राजस्थानमधील गंगानगरमधील अनुपगडमध्ये 60 मिमी पावसाची नोंद झाली.

Rain
पंतप्रधान मोदींनी उचलला दिल्लीत नव्याने उदघाटन झालेल्या बोगद्यातील कचरा: Video

तसेच येत्या 48 तासात कोटा, अजमेर, उदयपूर आणि बिकानेर विभागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार शक्यता आहे. जोधपूर विभागाच्या उत्तरेकडील भागातही मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते. 21 ते 22 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. 23 जूनपासून पश्चिम राजस्थानमधील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com