Weather Update: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, हवामान विभागाचा मच्छिमारांना इशारा

पुढील तीन ते चार तासांत या भागात मेघगर्जने सह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पाचही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील.
Weather Update: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, हवामान विभागाचा मच्छिमारांना इशारा
Weather UpdateDainik Gomantak

मुंबई: अंदमान (Andaman) समुद्राच्या क्षेत्रात हवेच्या कमी दाबाचे पट्ट्याचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अरबी समुद्रात (Arabian Sea) हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र (Low Pressure Area) तयार झाले आहे. येणाऱ्या पुढील एक-दोन दिवसात याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Rain in maharashtra) त्यामुळे पुढील पाचही दिवस हवामान खात्याकडून विविध जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. आज आणि उद्या मध्य-पूर्व अरबी समुद्रात आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) किनारपट्टीवर वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. 19 नोव्हेंबरनंतर याची व्याप्ती वाढू शकते. यामुळे पुढील पाच दिवस किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळपासूनच अरबी समुद्रात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास असेल.

Weather Update
Weather Updates: पर्वतीय राज्यात होतोय हिमवर्षाव, अनेक राज्यात अलर्ट जारी

पुढील काही तासांत वाऱ्याची गती आणखी वाढून याचा वेग 60 किमी प्रतितास इतका होईल. त्यामुळे मासेमारीसाठी मच्छिमारांनी जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. तसेच समुद्रात गेलेल्या मासेमारी बोटींना तातडीने समुद्रकिनारी येण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

या भागांना दिले सतर्कतेचे इशारे

हवामान खात्याकडून मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. पुढील तीन ते चार तासांत या भागात मेघगर्जने सह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पाचही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, घाट परिसर आदी भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. असे हवामान खात्याकडून (weather department) सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com