
देशातील अनेक राज्यांमध्ये अजूनही उष्णतेने लोक त्रस्तच आहेत, तर काही राज्यांमध्ये तुरळक व मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे. स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, मुंबईत 10 जून रोजी, म्हणजे शुक्रवारी पहिल्यांदाच मान्सूनपूर्व पाऊस पडला. मुंबईच्या सांताक्रूझ येथे 15 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याचवेळी सायंकाळी व रात्री शहरात ढगांचा गडगडाट व जोरदार पाऊस देखील झाला. (Weather Update Presence of monsoon in the country)
पुढील 24 तासांत सिक्कीम, ईशान्य भारत, किनारपट्टीवरील कर्नाटकचा काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटांचा काही भाग, कोकण आणि गोवा, किनारी आंध्र प्रदेशात एक किंवा दोन भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे आहे. दुसरीकडे, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य प्रदेश, गुजरातचा काही भाग, लक्षद्वीप आणि पश्चिम हिमालयात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याने सांगितले आहे.
बिहार, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर पंजाब, उत्तर हरियाणा आणि आग्नेय राजस्थानच्या काही भागामध्ये हलका पाऊस पडू शकतो. याशिवाय वायव्य राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, पंजाब आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या एक किंवा दोन भागात उष्णतेची लाट येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि त्याचवेळी, कोलकातामध्ये गेल्या आठवडाभरापासून अधूनमधून पाऊस पडत आहे. कोलकात्यात मान्सूनचे आगमन 11 जूनच्या आसपासच होत असते पण यंदा कोलकाताला मान्सूनसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.
पश्चिम बंगालसह किनारपट्टीच्या दोन्ही बाजूंनी परिस्थिती निर्माण होत असून ती उप-हिमालयीन पश्चिम बंगालपर्यंत पोहोचली. सध्या मान्सून कोलकात्यामध्ये पोहोचण्यासाठी किमान 4 ते 5 दिवस लागतील. पुढील दोन ते तीन दिवस शहरात हलका पाऊस पडू शकतो, मात्र तो मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.