Weather Updates:दोन दिवसात देशात मुसळधार केरळमध्ये रेड तर कर्नाटक तमिळनाडूमध्ये ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागराच्या नैत्येस चक्रीवादळाच्या हालचालींमुळे पाऊस पडू शकतो. हे पाहता केरळमध्ये रेड अलर्ट सुरू आहे (Weather Updates)
Weather Updates:दोन दिवसात देशात मुसळधार केरळमध्ये रेड तर कर्नाटक तमिळनाडूमध्ये ऑरेंज अलर्ट
Weather Updates: Red alert in Kerala & Orange alert in Karnataka, Tamil NaduDainik Gomantak

भारतीय हवामान विभागने (IMD) मंगळवारी दक्षिणेकडील केरळ (Kerala) राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे (Heavy Rain). या अनुषंगाने केरळ मधील काही भागात रेड तर काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने मंगळवारी केरळमधील इडुक्की या डोंगराळ जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी, मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता, पठानमथिट्टा, कोट्टायम, पलक्कड आणि मलप्पुरम जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.(Weather Updates: Red alert in Kerala & Orange alert in Karnataka, Tamil Nadu)

हवामान अंदाज देणाऱ्या एजन्सी वेदर चॅनलनेही देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. एजन्सीचे म्हणणे आहे की तामिळनाडूला लागून असलेल्या बंगालच्या उपसागराच्या नैत्येस चक्रीवादळाच्या हालचालींमुळे पाऊस पडू शकतो. हे पाहता केरळमध्ये रेड अलर्ट सुरू आहे तसेच तमिळनाडू आणि कर्नाटकमध्येही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने आज सकाळी ट्विट करून म्हटले आहे की, 'यमुनानगर, कुरुक्षेत्र, कैथल, करनाल, बरवाला, जींद, हिसार, हांसी, सहारनपूर, रामपूर, संभल, चांदौसी येथेही आज जोरदार पाऊस पडेल.' आयएमडीने आपल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की या भागात मंगळवारी जोरदार पाऊस पडेल, परंतु बुधवारीही यांपैकी अनेक भागात पाऊस सुरूच असणार आहे.

Weather Updates: Red alert in Kerala & Orange alert in Karnataka, Tamil Nadu
Indian Railways आणणार तब्ब्ल 800 हून अधिक रेल्वेगाड्या ‘रुळावर’

IMD ने म्हटले आहे की केरळवर नैत्येस मान्सून सक्रिय राहील आणि याचमुळे केरळ आणि लक्षद्वीपच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो. रेड अलर्ट म्हणजे 24 तासात 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, ऑरेंज अलर्ट म्हणजे 6 सेमी ते 20 सेंटीमीटर मुसळधार पाऊस आणि यलो अलर्ट म्हणजे 6-11 सेंमी पाऊस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.