Weather Updates: पर्वतीय राज्यात होतोय हिमवर्षाव, अनेक राज्यात अलर्ट जारी

राजधानी दिल्लीसह (Delhi) देशाच्या अनेक भागात मागील काही दिवसापांसून मुसळधार पाऊस पडत आहे.
Monsoon
MonsoonDainik Gomantak

राजधानी दिल्लीसह (Delhi) देशाच्या अनेक भागात मागील काही दिवसापांसून मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तराखंड (Uttarakhand) आणि हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले. देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा हवामान बदलण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पश्चिम राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू -काश्मीरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मैदानी भागात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पर्वतीय भागात बर्फवृष्टी होणार असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने जम्मू -काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस किंवा हिमवर्षाव होण्याची शक्यता वर्तवली होती. यानंतर शनिवारी काश्मीरच्या डोंगराळ भागात जोरदार बर्फवृष्टी झाली. हिमाचल प्रदेशातील अनेक भागात हिमवर्षाव होत आहे.

दिल्लीत हलका पाऊस पडू शकतो

भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर के जेनमनी यांनी सांगितले की, शनिवारी दिल्लीत ढगाळ आकाश असेल. शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी दिल्लीत हलका पाऊस पडू शकतो. पंजाबमध्ये चांगला पाऊस होईल, उत्तराखंड आणि इतर भागात पावसाची शक्यता आहे.

Monsoon
Monsoon Update: देशातून मान्सून परतीच्या वाटेवर, मात्र काहीं राज्यात पाऊस सुरूच

केरळ, तामिळनाडूमध्येही पावसाची शक्यता

केरळच्या किनारपट्टीवरील भागात शनिवारी सकाळी दक्षिण भारतात चक्रीवादळाने धडक दिली. या वादळाचे संचलन (Cyclonic Circulation) दक्षिण भारतात कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान, दक्षिण भारतातील विविध ठिकाणी जोरदार पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी आणि मंगळवारी तामिळनाडूच्या काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. केरळमध्ये सोमवारी मुसळधार पावसासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापूर्वी उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले होते. केदारनाथ यात्रा पावसामुळे कमी होण्याची अपेक्षा होती, पण हवामान खुले झाल्यानंतर यात्रेवर पावसाचा कोणताही परिणाम झाला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com