Weather Updates Today: या राज्यांमध्ये पावसाचा इशारा, जाणून घ्या तुमच्या शहराचे हवामान

16 ऑगस्ट 2022 रोजीही बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे.
Weather Update
Weather UpdateDainik Gomantak

Weather Updates: सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये सक्रिय मान्सूनची स्थिती आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याने (IMD) आज, 16 ऑगस्ट 2022 रोजीही बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहील. तसेच, राष्ट्रीय राजधानीत पावसाची शक्यता आहे. गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये आजचे किमान तापमान 25 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहील. मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल.

Weather Update
Delhi: चायनीज मांजाने तरुणाचा कापला गळा, रुग्णालयात झाला मृत्यू

भोपाळमध्ये आज हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळ राहील. आजचे किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस राहील. चंदीगडमध्ये आजचे किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. चंदीगडमध्ये आज ढगाळ वातावरण राहील.

दुसरीकडे, डोंगराळ भागात मुसळधार पाऊस पडत आहे. डेहराडूनमध्ये आजचे किमान तापमान 24 अंश सेल्सिअस असणार आहे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जम्मूबद्दल बोलायचे झाले तर आज या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथील किमान तापमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहील.

Weather Update
स्वातंत्र्यदिनी Kashmir मध्ये दहशतवादी हल्ला, पोलीस कर्मचारी अन् नागरिक जखमी

दिल्ली हवामान अपडेट

लखनौ, यूपीमध्ये आजचे किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. याशिवाय आज बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाटणा येथे आजचे किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहील, तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहील. येथे हलका पाऊस पडेल आणि आकाश ढगाळ राहील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com