जीओएएल प्रकल्पावर आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केला वेबिनार

pib
शनिवार, 11 जुलै 2020

प्रशिक्षणार्थींना या कार्यक्रमांतर्गत पुढील मान्यता मिळतील – एमओटीए आणि फेसबुक यांच्याकडून सहभागाचे संयुक्त प्रमाणपत्र, उद्योजकता, व्यावसायिकता क्षेत्रातील उच्च दर्जाच्या प्रभावशाली व्यक्तींशी, गटाशी संवाद साधण्याची संधी, इद्यादी. एमओटीए आणि फेसबुक यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्राधान्य प्रवेश, मार्गदर्शक म्हणून पोर्टलवर माहिती दाखविली जाईल. आणि उद्योग आणि राजकीय नेत्यांना भेटण्याची संधी.

 नवी दिल्ली, 

आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने भारतातील अनुसूचित जमाती मतदारसंघातील खासदारांच्या संवेदनशीलतेसाठी फेसबुक इंडियाच्या माध्यमातून `गोईंग ऑनलाइन अँज लीडर्स प्रकल्प` (जीओएएल) विषयावर आज वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.  केंद्रिय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा, आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या केंद्रिय राज्यमंत्री श्रीमती रेणुका सिंग सरुता, संसदेचे अनेक सदस्य आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि फेसबुक इंडिया यांनी वेबिनारमध्ये भाग घेतला.

वेबिनारमध्ये बोलताना, श्री अर्जुन मुंडा म्हणाले की, गोईंग ऑनलाइन अँज लीडर्स (जीओएल) हे डिजिटल कोशल्य आणि मार्गदर्शक उपक्रम आहे, ज्यामुळे व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, राजकारण, कला आणि उद्योजकता या संबंधित क्षेत्रातील क्षेत्रातील प्रसिद्ध नेते आणि तज्ज्ञ डिजिटल यंत्रणेद्वारे अनुसूचित जमातीच्या तरुणांना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करू शकणार आहेत. हा कार्यक्रम अनुसूचित जमातीच्या तरुणांना भविष्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सक्षम करणार आहे. या उपक्रमात प्रामुख्याने आदिवासी भागात राहणाऱ्या तरुणांची क्षमता वाढविणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आदिवासी तरूणांनी आपले आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी मोबाईल फोनचा एक माध्यम म्हणून वापर करावा, असे आवाहन त्यांनी युवकांना केले. ते म्हणाले की त्यांनी फेसबुकसारख्या सोशल मिडियाला आपल्या जीवनातील उद्दिष्टांशी जोडले पाहिजे. जीओएल हा तरुणांसाठी संधी निर्माण करणारा उपक्रम असल्यामुळे, जीओएल हा मार्गदर्शक आणि विद्यार्थी यांच्यातील कौशल्यपूर्ण कल्पनांची देवाण – घेवाण करण्यासाठी एक दुवा असू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.  

मार्गदर्शक आणि विद्यार्थी हे 1 : 2 असे प्रमाण असावे, असा उद्देश आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी नऊ महिने किंवा 36 आठवडे बांधिल आहेत.

-1 महिना ते 7 महिने (28 आठवडे) – आदिवासी जमातीतील प्रशिक्षणार्थी मार्गदर्शकांशी जोडले जातील.

-8 महिने ते 9 महिने (8 आठवडे) – निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना नामांकित संस्थांमध्ये काम करण्याची संधी

स्वतःबद्दलची मूलभूत माहिती देऊन प्रशिक्षणार्थी किंवा मार्गदर्शक हे त्यांचे अर्ज http://goal.tribal.gov.in/ या पोर्टलवर भरू शकतात. कोणत्याही मार्गदर्शक किंवा प्रशिक्षणार्थ्याला आर्थिक मानधन दिले जाणार नाही. यामध्ये रस असणारे अनुसूचित युवक, facebook-goal@tribal.gov.in  या ठिकाणी त्यांना जीओएएल बाबत काही शंका असल्यास विचारू शकतात किंवा जीओएल पोर्टलवर `Contact Us` येथेही शंका विचारू शकतात.

आदिवासी जमातीमधील 18 ते 35 वयोगटातील युवक प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज करू शकतात. आदिवासी समाजातील सर्व तरुणांसाठी मग ते कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा भाग असोत वा नसो किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात असोत वा कोणतेही प्रशिक्षण घेत असले तरीसुद्धा हा उपक्रम त्यांच्यासाठी खुला आहे.

संपादन - तेजश्री कुंभार 

 

 

संबंधित बातम्या